कसं काय, कर्जत-जामखेडकरांनो! Rohit Sharma ची मराठीत 'बोलं'दाजी; वर्ल्ड कप विजयाची आठवण

Rohit sharma and Rohit Pawar: भारतीय कर्णधार रोहित शर्मा कर्जतमध्ये स्वत:ची क्रिकेट अकॅडमी सुरू करत असून रोहित शर्मासह आमदार रोहित पवार देखील भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत.
rohit sharma and rohit pawar
rohit sharma and rohit pawaresakal
Updated on

Rohit sharma and Rohit pawar in karjat: भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिअनचे अध्यक्ष व आमदार रोहित पवार कर्जत-जामखेड त्याच्या मध्ये होणाऱ्या भव्य स्टेडियमच्या भूमिपुजनासाठी उपस्थित आहेत. रोहित शर्माला पाहण्यासाठी कर्जतमध्ये प्रचंड जनसमुदाय एकत्र आला आहे. स्टेडियमसोबत स्टार खेळाडू रोहित शर्मा कर्जत-जामखेड येथे त्याची क्रिकेट अकॅडमी देखील सुरू करत आहे. त्यामुळे कर्जत परिसरातील क्रीडाप्रेमी युवकांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.

क्रिकेट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी आमदार रोहित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. कर्जत-जामखेड येथील राशीन येथे भव्य स्टेडियमचे उद्घाटन होणार असून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. त्यासाठी रोहित शर्माच्या उपस्थितीत आमदार रोहित पवार यांनी कर्जतमध्ये क्रीडा संकुल उभारणार असल्याची घोषणा केली आहे.

Rohit sharma
Rohit sharmaesakal

भूमिपूजन सोहळ्यानिमित्त जमलेल्या जनसमुदायाला संबोधताना आमदार रोहित पवार म्हणाले, "रयत शिक्षण संस्थेच्या परिसरात भव्य स्टेडियम आणि क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. आपल्या खेळांडूंसाठी संधी निर्माण व्हावी हा त्यामागचा प्रयत्न आहे.'

'मी रोहित शर्माचे आभार व्यक्त करतो, कारण रोहित शर्मा त्यांची विजडम क्रिकेट अकॅडमी आपल्या जामखेड मध्ये सुरू करत आहे. ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना व्यासपीठ मिळावे म्हणून हा प्रयत्न आहे." असे ते पुढे म्हणाले.

या कार्यक्रमात रोहित शर्मा म्हणाला, " ३ महिन्यांपूर्वी आम्ही भारतासाठी वर्ल्ड कप जिंकलो. वर्ल्ड कप जिंकणे हे आमचे पहिले लक्ष्य होते. वर्ल्ड कप जिंकल्यावर माझ्या जिवात जिव आला.

मी इथे माझी क्रिकेट अकॅडमी सुरू करत आहे आणि मला खात्री आहे की, पुढचे यशस्वी जैस्वाल, शुभमन गील, जसप्रीत बुमराह याच भागात तयार होतील. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी धन्यवाद."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.