Challenges for India in WTC 2025: जवळपास एका महिन्याच्या विश्रांतीनंतर भारतीय क्रिकेट संघ मैदानात उतरत आहे. तसं पाहिलं तर भारतीय क्रिकेट आणि विश्रांती असा योग फारच दूर्मिळ असतो. एक मालिका संपते तोच दुसरी मालिका...ही माळ एकात एक अशी गुंतलेली असते बघता बघता आपण किती सामने खेळलो हे खेळाडूंनाही कळतही नाही.
योगायोगानं, सूदैवाने किंवा नियोजनामुळे म्हणा भारतीय संघाला चांगलीच विश्रांती मिळालीय हे खरे असले तरी आता पुढे विश्रांतीचा विचारही करायचा नाही, इतक्या सामन्यांचा खो-खो रोहित शर्मा आणि त्याच्या संघाला करायचा आहे. पण त्यात महत्वाची आहे ती कसोटी अजिंक्यपद मालिका आणि त्यातला अंतिम सामना. भारतासाठी ही एक अधुरी कहाणी आहे.
कारण व्हाईटबॉल क्रिकेटच्या विश्वकरंडक अपयशाची कोंडी रोहित शर्माच्या संघाने जूलै महिन्यात फोडली आणि भारतीय संघ १३ वर्षांनी पुन्हा विश्वविजेता ठरला. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखूनही विजेतेपद काही मिळालेले नाही.