Team India Matches: वर्ल्ड कप 2026 पर्यंत टीम इंडिया ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसह 7 संघाविरुद्ध खेळणार T20 सामने, पाहा टाईमटेबल

Team India T20I Matches: पुढच्या दोन वर्षात भारतीय संघाला ३० हून अधिक टी२० सामने खेळायचे आहेत.
Team India
Team IndiaSakal
Updated on

Team India T20I Matches: भारतीय संघाने तब्बल 17 वर्षांनंतर 29 जून 2024 रोजी दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप टॉफी जिंकली होती. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत केले होते.

याआधी 2007 मध्ये कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकप जिंकला होता. विश्वविजेता झाल्यावर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी टी-20 इंटरनॅशनल मधून निवृत्ती जाहीर केली.

आता येणारा टी-20 वर्ल्डकप ह्या तीन खेळाडूंशिवाय भारतीय संघ खेळणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला टी-20 संघासाठी एक कर्णधारही शोधावा लागणार आहे.

आता पुढचा टी-20 वर्ल्डकप हा भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त आयोजनात फेब्रुवारी- मार्च 2026 मध्ये खेळवला जाणार आहे. यासाठीही आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. सध्या टीम झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताची झिम्बाब्वेविरुद्ध 5 टी-20 सामन्यांची मालिका सुरू आहे.

Team India
Team India Prize: महाराष्ट्र शासनाकडून जगज्जेत्या टीम इंडियाला 11 कोटींचं बक्षीस, मुख्यमंत्री शिंदेची मोठी घोषणा

2026 वर्ल्डकपआधी 34 टी-20 सामने

टी-20 वर्ल्डकप 2024 जिंकल्यानंतर 15 मधील 12 खेळाडूंना झिम्बाब्वे दौऱ्यासाठी आराम देण्यात आला आहे. या दौऱ्यासाठी शुभमन गिल याला कर्णधार बनवण्यात आलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) फ्युचर टुर प्रोग्राम (FTP) नुसार भारतीय संघाला 2024 आणि 2026 टी-20 वर्ल्डकपच्या मधल्या काळात 8 द्विपक्षीय टी-20 मालिका खेळायच्या आहेत. यामध्ये 4 घरच्या मैदानावर खेळायचे आहे.

भारत जवळपास 34 टी-20 सामने खेळणार आहे. पण त्यात वेळ आणि परिस्थितीनुसार काही बदल होऊ शकतात. तरी साधारण भारताला कोणाकोणाविरुद्ध टी२० मालिका खेळायच्या आहेत, हे जाणून घेऊ.

Team India
Team India’s Jersey: काय सांगता? टीम इंडियाच्या जर्सीमध्ये मोठी चूक? वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कोणीच दिले नाही लक्ष

टी-20 वर्ल्डकप 2026 आधी भारतीय संघाचे सामने...

  • 5 सामन्यांची टी-20 मालिका विरुद्ध झिम्बाब्वे - जुलै 2024

  • 3 सामन्यांची टी-20 मालिका विरुद्ध श्रीलंका- जुलै 2024

  • 3 सामन्यांची टी-20 मालिका विरुद्ध बांगलादेश - सप्टेंबर 2024 (मायदेशात)

  • 5 सामन्यांची टी-20 मालिका विरुद्ध इंग्लंड - जानेवारी-फेब्रुवारी 2025 (मायदेशात)

  • 3 सामन्यांची टी-20 मालिका विरुद्ध बांगलादेश ऑगस्ट 2025

  • 5 सामन्यांची टी-20 मालिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया ऑक्टोबर 2025

  • 5 सामन्यांची टी-20 मालिका विरुद्ध दक्षिण आफ्रिका- नोव्हेंबर 2025 (मायदेशात)

  • 5 सामन्यांची टी-20 मालिका विरुद्ध न्यूझीलंड - जानेवारी 2026 (मायदेशात)

Crossword Mini:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.