Gautam Gambhir Team India's Calendar : अखेर गौतम गंभीर यांच्या नावावर भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची मोहर उमटवण्यात आली. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सोशल मीडियाद्वारे गंभीर यांची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आल्याची माहिती दिली. गंभीर आता डिसेंबर २०२७ पर्यंत भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर कायम राहणार असून टी-२०, एकदिवसीय व कसोटी अशा तिन्ही प्रकारांत ते खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत.
जय शहा यांनी घोषणा करताना म्हटले की, सध्या क्रिकेट या खेळाचा झपाट्याने विकास होत आहे. गौतम गंभीर यांनी आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीत विविध भूमिका नेटाने पार पाडल्या आहेत. भारतीय क्रिकेटला प्रगतिपथावर नेण्यासाठी तेच योग्य व्यक्ती आहेत. मुख्य प्रशिक्षकपदी गंभीर यांची नियुक्ती करण्यात आली असून बीसीसीआयकडून त्यांना हवे तेवढे सहकार्य लाभणार आहे.
गंभीरच्या कार्यकाळातील आयसीसी इव्हेंट
२०२५ - चॅम्पियन्स करंडक, पाकिस्तान
२०२५ - जागतिक कसोटी अंतिम सामना, लॉर्ड्स
२०२६ - टी-२० वर्ल्ड कप, भारत व श्रीलंका
२०२७ - एकदिवसीय विश्वकरंडक, दक्षिण आफ्रिका
२०२७ - जागतिक कसोटी अंतिम सामना
गंभीरच्या कार्यकाळाचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे
वनडे आणि टी-20 मालिका (श्रीलंका 2024)
२०२४ मध्ये ऑस्ट्रेलियात 5 कसोटी
२०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी
२०२५ मध्ये WTC अंतिम
२०२५ मध्ये इंग्लंडमध्ये 5 कसोटी
२०२६ मध्ये टी-20I वर्ल्ड कप
२०२६ मध्ये न्यूझीलंडमध्ये 2 कसोटी
२०२७ मध्ये WTC अंतिम
२०२७ मध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप
मोलाचा अनुभव
गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनात आयपीएलमधील लखनौ सुपरजायंट्स संघाने सलग दोन मोसमांत प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. त्यानंतर गंभीर यांच्याच मार्गदर्शनात कोलकाता नाईट रायडर्स संघाने यंदा आयपीएलच्या जेतेपदावर नाव कोरले. गंभीर यांचा प्रशिक्षकपदाचा अनुभव मोलाचा आहे. त्यामुळे त्यांची निवड करण्यात आली आहे.
विश्वकरंडकात महत्त्वपूर्ण खेळी
गौतम गंभीर यांनी मेंटॉर किंवा प्रशिक्षक म्हणून मौल्यवान कामगिरी केलीच आहे; पण याचसोबत भारताचा क्रिकेटपटू म्हणूनही त्यांनी संस्मरणीय प्रदर्शन केले आहे. २००७ मधील टी-२० विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत त्याने अर्धशतकी खेळी साकारत टीम इंडियाला अजिंक्यपद मिळवून दिले होते. २०११मधील एकदिवसीय विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत त्याने पुन्हा अर्धशतकी खेळी साकारताना भारताला १९८३नंतर विश्वविजेते बनवले होते. एवढेच नव्हे, तर गंभीर यांच्या कर्णधारपदात केकेआरचा संघ आयपीएल चॅम्पियनही बनला, हे विशेष.
स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न
भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी निवड करण्यात आल्यानंतर गौतम गंभीर भावुक झाले. ते म्हणाले, भारत देश ही माझी ओळख असून देशाची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले आहे. या वेळी भिन्न भूमिकेत असणार आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असेच माझे ध्येय असणार आहे. १४० कोटी जनतेचे स्वप्न पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.