टीम इंडिया WTC Final मध्ये कशी पोहोचणार? ICC ने सांगितला मार्ग, पण २ जागांसाठी ५ स्पर्धक

World Test Championship Final : भारताने मालिका गमावली असली तरी न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठीची चुरस आता रंजक वळणावर आली आहे.
WTC final
WTC final esakal
Updated on

ICC explained WTC Final Scenario : भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या मागील दोन पर्वात अंतिम फेरीत प्रवेश केला, दुर्दैवाने त्यांना दोन्ही वेळेस उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावल्यानंतर भारतीय चाहत्यांना WTC च्या चषकाचे स्वप्न पडू लागले आहेत. भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखल्याने अंतिम फेरीत आपली जागा निश्चित मानली जात होती. पण, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत २-० असा मार खावा लागल्यानंतर सर्व गणित बिघडले आहे. आता टीम इंडिया फायनलमध्ये कशी पोहोचणार, याचे समीकरण ICC ने समजावून सांगितले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.