India's Schedule T20 WC 2024: भारत-पाकिस्तान महामुकाबला ६ ऑक्टोबरला; टीम इंडियाचं वेळापत्रक आलं समोर

India vs Pakistan T20 World Cup 2024 : भारत-पाकिस्तान या देशांतील क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार अनुभवता येणार आहे.
ICC Women's T20 World Cup 2024
ICC Women's T20 World Cup 2024 esakal
Updated on

India's schedule for the ICC Women's T20 World Cup 2024 : आगामी महिला ट्वेंटी- २० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेतील भारतीय संघाचे वेळापत्रक समोर आले आहे. बांगलादेशमधील अस्थीर वातावरण लक्षात घेता ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती येथे हलवण्यात आली आहे आणि ३ ते २० ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजक बांगलादेश क्रिकेट बोर्डच असणार आहे.

Women’s T20 World Cup 2024 fixtures : महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे सामने दुबई आणि शाहजाह येथे खेळवले जाणार आहेत. सहावेळा वर्ल्ड कप उंचावणाऱ्या ऑस्ट्रेलियासमोर अ गटात २०२०च्या उपविजेत्या भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचे आव्हान असणार आहे. ब गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, २०१६चा चॅम्पियन वेस्ट इंडिज, बांगलादेश व स्कॉटलंड हे समोरासमोर असतील.

श्रीलंका आणि स्कॉटलंड हे आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत दाखल झाले आहेत. प्रत्येक संघ गटात चार सामने खेळतील आणि अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. १७ व १८ ऑक्टोबरला उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. २० ऑक्टोबरला फायलन दुबईत होईल आणि उपांत्य फेरी व अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस आहेत.

भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यास ते Semi-final 1 मध्ये खेळतील. एकूण २३ सामने खेळवले जाणार आहेत. २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत १० सराव सामने होतील.

Women’s T20 World Cup 2024 fixtures
Women’s T20 World Cup 2024 fixturesesakal

स्पर्धेचे वेळापत्रक ( Full Schedule)

  • ३ ऑक्टोबर, गुरुवार - बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड, शारजाह

  • ३ ऑक्टोबर, गुरुवार - पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, शारजाह

  • ४ ऑक्टोबर, शुक्रवार - दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, दुबई

  • ४ ऑक्टोबर, शुक्रवार - भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई

  • ५ ऑक्टोबर, शनिवार - बांगलादेश विरुद्ध इंग्लंड, शारजाह

  • ५ ऑक्टोबर, शनिवार - ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, शारजाह

  • ६ ऑक्टोबर, रविवार - भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई

  • ६ ऑक्टोबर, रविवार - वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड, दुबई

  • ७ ऑक्टोबर, सोमवार - इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजाह

  • ८ ऑक्टोबर, मंगळवार - ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, शारजाह

  • ९ ऑक्टोबर, बुधवार - दक्षिण आफ्रिका विरुद्ध स्कॉटलंड, दुबई

  • ९ ऑक्टोबर, बुधवार - भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई

  • १० ऑक्टोबर, गुरुवार - बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, शारजाह

  • ११ ऑक्टोबर, शुक्रवार - ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, दुबई

  • १२ ऑक्टोबर, शनिवार - न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, शारजाह

  • १२ ऑक्टोबर, शनिवार - बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दुबई

  • १३ ऑक्टोबर, रविवार - इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड, शारजाह

  • १३ ऑक्टोबर, रविवार - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजा

  • १४ ऑक्टोबर, सोमवार- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, दुबई

  • १५ ऑक्टोबर, मंगळवार - इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, दुबई

  • १७ ऑक्टोबर, गुरुवार - उपांत्य फेरी १, दुबई

  • १८ ऑक्टोबर, शुक्रवार - उपांत्य फेरी २, शारजाह

  • २० ऑक्टोबर, रविवार - फायनल, दुबई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.