Suresh Raina's uncle murdered case in 2020: इंडियन प्रीमिअर लीग २०२० मध्ये सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यात कडाक्याचं भांडण झाल्याच्या वावड्या उठल्या होत्या. रैना संतापून आयपीएल मध्येच सोडून मायदेशी परतण्यामागे धोनीसोबतचा वाद असल्याचे म्हटले गेले होते. पण, खरं कारण जेव्हा समोर आलं तेव्हा सारेच स्तब्ध झाले होते.
भारताच्या माजी क्रिकेटपटूचे काका अशोक कुमार यांची निर्घृणपणे हत्या झाली होती. त्यामुळेच रैना दुबईहून तातडीने भारतात परतला होता. चार वर्षांनी सुरेश रैना आणि त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला. या प्रकरणातील १२ दोषींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
पठाणकोट जिल्ह्यातील थारियाल गावातील घराच्या टेसेरवर १९ ऑगस्ट २०२० च्या रात्री रैनाची मावशी आशादेवी आणि काका अशोक कुमार यांचे कुटुंब झोपले होते. त्यावेळी दरोड्याच्या उद्देशाने काही लोकं घरात शिरली. त्यांना विरोध केला असता त्यांनी अशोक कुमार व कुटुंबियांवर धारदार शस्त्रांनी वार केले.
बव्हेरिया टोळीच्या या हल्ल्यात अशोक कुमार जागीच ठार झाले, तर आशा देवी ( ५५), मावशीचा मोठा मुलगा कौशल कुमार ( ३२ ), लहान मुलगा अपिन कुमार ( २४) आणि मावशीच्या सासूबाई सत्या देवी ( ८०) या गंभीर जखमी झाल्या होत्या. हल्लेखोरांनी घरातून रोख रक्कम आणि सोनेही नेले. आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी जखमींना रुग्णालयात नेले.
कौशल कुमार यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आशा देवी दीड वर्ष कोमात होत्या. कोमातून बाहेर आल्यानंतर त्यांनी या खटल्यात साक्ष दिली. या प्रकरणात न्यायालयाने १२ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे आणि त्यात ३ महिलांचाही समावेश आहे. पठाणकोट जिल्हा सत्र न्यायाधीश जितेंद्र पाल सिंह खुर्मी यांनी सर्व दोषींना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.