Pakistan Cricket: शाहिन आफ्रिदीला ट्वेंटी-२० कर्णधारपदावरून हटवणे हा अन्याय...; माजी खेळाडूला संताप अनावर

captaincy shuffle in Pakistan cricket team 'शाहीन अफ्रिदीला अचानक कर्णधारपदावरून हटवणे हा त्याच्यावरचा अन्याय आहे' असे वक्तव्य एका माजी पाकिस्तानी खेळाडूने केला आहे.
Pakistan captain
Pakistan captainesakal
Updated on

Pakistan Cricket Team Captaincy: गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान क्रिकेट संघातील कर्णधार बदल हा चर्चेचा मुद्दा बनला आहे. बाबर आझमला कर्णधारपदावरून हटवण्यानंतर त्यानंतर पाकिस्तान संघात बरेच नेतृत्व बदल करण्यात आले. सध्या कसोटी संघाचा कर्णधारपदावर शान मसूद आहे आणि ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व शाहिनकडे होते. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या तोंडावर न्यूझीलंडकडून १-४ असा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्याच्याकडून ही जबाबदारी काढून घेतली आणि पुन्हा बाबरला कर्णधार केले गेले.

२०२३ च्या वान डे वर्ल्ड कप नंतर बाबर आझमने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार मोहम्मद रिझवान नवा कर्णधार होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या या कर्णधारपदाच्या संगीत खूर्चीवरून अनेक माजी पाकिस्तानी खेळाडूंनी चिंता व्यक्त केली आहे. त्यापैकी पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक मोईन खान याने शाहिनला अचानक कर्णधार पदावरून काढल्यामुळे त्याच्यावर अन्याय झालाय असे वक्तव्य केले.

Pakistan captain
पाकिस्तान आपल्या कर्मानं Champions Trophy चं यजमानपद घालवणार? वाचा नक्की भानगड काय

"शाहीनकडे नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि संघातील खेळाडूंसोबत त्याचे संबंध चांगले आहेत. ट्वेंटी-२० कर्णधारपदासाठी त्याच्याइतका चांगला दुसरा पर्याय दिसत नाही. त्याला कर्णधारपदावरून अचानक काढून टाकणे अन्यायकारक होते. तो ट्वेंटी -२० क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे आणि त्याला कर्णधारपदावरून काढल्याने त्याच्या कामगिरीत घसरण झाली आहे. त्याला कर्णधार म्हणून आणखी काही काळ द्यायला हवा होता,''असे मोईन अलीने विधान व्यक्त करून पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीका केली.

"क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटसाठी एकाच कर्णधाराची नियुक्ती केली जाऊ शकते, परंतु हे साध्य करण्यासाठी त्या खेळाडूने सर्व फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. ज्याची कर्णधारपदी निवड होईल त्याच्याकडे दीर्घकाळ जबाबदारी असली पाहिजे. सध्या मोहम्मद रिझवानच्या क्षमतेबद्दल कोणतीही शंका नाही. त्याच्या वाढत्या वयामुळे त्याच्या आगामी कारकिर्दीवर प्रश्न निर्माण होऊ शकतो." मोईन पुढे म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.