SL Kings vs SKN Patriots: एव्हिन लुईसचे शतक, कायल मेयर्सची फटकेबाजी व्यर्थ; Saint Lucia Kings चा अविश्वसनीय विजय

Caribbean Premier League: सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रिओट्सचे २०२ धावांचे लक्ष्य पूर्ण करताना सेंट लुसिया संघाची पडझड झाली होती, पण..
Tim Seifer
Tim Seiferesakal
Updated on

Saint Lucia Kings: कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये २०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ४ बाद २४ अशी अवस्था झालेली असूनही दोन फलंदाजांच्या बळावर सेंट लुसियाने बाजी मारली. एव्हिन लुईस आणि कायल मेयर्सच्या जोडीने उभा केलेला धावांचा डोंगर सर करत सेंट लुसियाच्या भानुका राजपक्षा व टीम सेफर्टच्या जोडीने सेंट लुसिया संघाला हाताबाहेर गेलेल्या सामन्यातून तारले.

पॅट्रिओट्स संघाचा सलामीवीर एव्हिन लुईस आणि कायल मेयर्सच्या जोडीने या सामन्यात दुसऱ्या विकेटसाठी १९९ धावांची भागीदारी केली. ज्यामधे सलामीवीर एव्हिन लुईसने ५४ चेंडूंमधे १०० धावांची नाबाद खेळी केली, तर कायल मेयर्यसने ६२ चेंडूंमधे ९२ धावांची खेळी केली. या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर पॅट्रिओट्स संघाने २०२ धावांचे लक्ष्य दिले.

Tim Seifer
भारतीय फलंदाज इरेला पेटला! केली रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी; IPL 2025 पूर्वी फ्रँचायझींना दाखवला दम...

लक्ष्याचा पाठलाग करताना सेंट लुसियाने २४ धावांवर ४ विकेट्स गमवल्या होत्या. सेंट लुसिया संघाचा फलंदाज भानुका राजपक्षाने ६ चौकार आणि ४ षटकारांसह ३५ चेंडूंमध्ये ६८ धावा करत सामना सावरला. त्याला टीम सेफर्टची साथ मिळाल्याने सामना लुसियाच्या बाजुने झुकला. टीम सेफर्ट याने २७ चेंडूंमध्ये धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ चौकारांसह ६ षटकार ठोकले. या दोघांच्या ४४ चेंडूंमधील १०३ धावांच्या भागीदारीने सेंट लुसियाच्या बाजूने सामना फिरवला. सेंट लुसियाच्या या विजयामध्ये डेविड विजेच्या २० चेंडूंमधील ३४ धावांच्या खेळीचे देखील तितकेच योगदान आहे.

विजने फलंदाजीप्रमाणे गोलंदजीमध्येही कमाल केली होती. ३ षटकांमध्ये २ विकेट्स घेत पॅट्रिओट्स संघाची वाढती धावसंख्या रोखली होती. या सामन्यामध्ये सेंट लुसियाकडून विकेट घेणारा तो एकमेव गोलंदाज ठरला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.