Australia Cricket: ऑस्ट्रेलियन संघाला सिरीज जिंकल्यानंतर मिळाला चक्क Ice-Cream कप; पाहा कशी होती खेळाडूंची रिऍक्शन

Australia Cricket team: ऑस्ट्रेलियाने नुकतीच स्कॉटलंड दौऱ्यात टी२० मालिका जिंकली. ही मालिका जिंकल्यानंतर त्यांना एक आगळी-वेगळी ट्रॉफी देण्यात आली, ती पाहून खेळाडूंची रिऍक्शन कशी होती, पाहा.
Australia Cricket Team
Australia Cricket TeamSakal
Updated on

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने नुकताच स्कॉटलंड दौरा केला. हा त्यांचा पहिलाच स्कॉटलंड दौरा होता. त्यांनी या दौऱ्यात यजमान स्कॉटलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने ३-० असा सहज विजय मिळवला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आणखी एक हसण्याचे कारण मिळाले, ते कारण म्हणजे त्यांना मिळालेली ट्रॉफी.

मालिकेतील तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्यानंतर कर्णधार मिचेल मार्शला मालिका विजयाची ट्रॉफी देण्यात आली. ही ट्रॉफी आईस-क्रीम कपसारखी दिसत होती. त्यामुळे ती ट्रॉफी पाहाताच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाही त्यांचे हसू रोखता आले नाही. त्यांची ही रिऍक्शन कॅमेऱ्यातही कैद झाली.

Australia Cricket Team
IND vs AUS Test: ऑस्ट्रेलियाला घरात घुसून पुन्हा हरवणार अन् भारत मालिका 'या' फरकानं जिंकणार, गावसकरांचा दावा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.