Australia beat England 1st T20I : ट्रॅव्हिस हेडला रोखणं ( Travis Head) आता अवघड झालं आहे, असं वाटतंय... स्कॉटलंडच्या गोलंदाजांची धुलाई केल्यानंतर हेडने काल इंग्लंडच्या गोलंदाजांना बदडले.. त्याने सॅम कुरनच्या एका षटकात ३० धावा चोपल्या आणि १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे वेगवान अर्धशतक ठरले. इंग्लंडच्या संघानेही टीम हॅटट्रिक घेऊन ऑसींच्या धावगतीला ब्रेक लावला, परंतु विजय त्यांना मिळवता आला नाही.
प्रथम फलंदाजी करताना मॅथ्यू शॉर्ट व हेड यांनी पहिल्या पॉवर प्लेमध्येच ८६ धावा चोपल्या. हेडने सॅम कुरनच्या एका षटकात ३ चौकार व तितकेच षटकार खेचून ३० धावा जोडल्या. तो २३ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ५९ धावा करून माघारी परतला. शॉर्टने २६ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४१ धावा केल्या. कर्णधार मिचेल मार्श, मार्कस स्टॉयनिस, टीम डेव्हिड यांच्या अपयशामुळे धावगती मंदावली. जोश इंग्लिस २७ चेंडूंत ३७ धावा चोपून संघाला १७९ धावांपर्यंत घेऊन गेला.
२००५ मध्ये रिकी पाँटिंग विरुद्ध डॅरिल टफी
२०२१ मध्ये डॅन ख्रिश्चन विरुद्ध शाकीब अल हसन
२०२४ मध्ये मिचेल मार्श विरुद्ध जॅक जार्विस
२०२४ मध्ये ट्रॅव्हिस हेड विरुद्ध सॅम कुरन
१८व्या षटकाच्या पाचव्या व सहाव्या चेंडूवर जोफ्रा आर्चरने अनुक्रमे सीन एबॉट व झेव्हियर बार्टलेट यांना माघारी पाठवले. त्यानंतर १९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर साकिब महमूदने कॅमेरून ग्रीनची विकेट घेऊन टीम हॅटट्रिक पूर्ण केली.
ऑस्ट्रेलिया ८६/१ वि. इग्लंड Southampton, २०२४
वेस्ट इंडिज ८३/० वि. ऑस्ट्रेलिया Oval,२००९
इंग्लंड ७८/० वि. पाकिस्तान Oval, २०२४
लक्ष्याचा पाठलाग करायला आलेल्या इंग्लंडला १९.२ षटकांत सर्वबाद १५१ धावा करता आल्या. पहिल्या इनिंग्जमध्ये ३ विकेट्स घेणारा लिएम लिव्हिंगस्टोन फलंदाजीतही चमकला. त्याने इंग्लंडसाठी सर्वाधिक ३७ धावा केल्या. कर्णधार फिल सॉल्ट २० धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या सीन एबॉटने ३ विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूड व अॅडम झम्पा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.