Women’s T20 World Cup 2025 : पुढील वर्षी होणाऱ्या १९ वर्षांखालील मुलींच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा झाली. मलेशियात होणाऱ्या या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. भारतीय महिला संघाने पहिल्या पर्वात इंग्लंडवर विजय मिळवून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावला होता. जेतेपद कायम राखण्याच्या शर्यतीत त्यांच्यासमोर अ गटात मलेशिया, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांचे आव्हान असणार आहे.
१८ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. ब गटात इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिका यांचा समावेश आहे. क गटात दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, सामोआ आणि आफ्रिकन गटातील पात्रता फेरीतून आलेला संघ असेल. ड गटात ऑस्ट्रेलिया. बांगलादेश, स्कॉटलंड व आशिया गटातील पात्रता फेरीतून आलेल्या संघाचा समावेश आहे.
साखळी फेरीत प्रत्येक संघ आपापल्या गटातील प्रतिस्पर्धीविरुद्ध खेळतील आणि त्यामुळे प्रत्येकी ३ सामने त्यांना खेळावे लागतील. प्रत्येकी गटातील अव्वल तीन संग सुपर सिक्स गटासाठी पात्र ठरतील. अ, ड, ब आणि क गटातील तळाला असलेला संघ २४ जानेवारीला प्ले ऑफसाठी खेळतील. सुपर सिक्समधील १२ संघाची पुन्हा दोन गटांत विभागणी होईल. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पात्र ठरतील आणि ३१ जानेवारीला या लढती होतील. २ फेब्रुवारीला फायनल होईल.
१८ जानेवारी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्कॉटलंड
१८ जानेवारी: इंग्लंड विरुद्ध आयर्लंड
१८ जानेवारी: समोआ विरुद्ध आफ्रिका पात्रता
१८ जानेवारी: बांगलादेश विरुद्ध आशिया पात्रता
१८ जानेवारी: पाकिस्तान विरुद्ध अमेरिका
१८ जानेवारी: न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका
१९ जानेवारी: श्रीलंका विरुद्ध मलेशिया
१९ जानेवारी : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
२० जानेवारी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश
२० जानेवारी: आयर्लंड विरुद्ध यूएसए
२० जानेवारी: न्यूझीलंड विरुद्ध आफ्रिका पात्रता
२० जानेवारी: स्कॉटलंड विरुद्ध आशिया पात्रता
२० जानेवारी: इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान
२० जानेवारी: दक्षिण आफ्रिका विरुद्ध सामोआ
२१ जानेवारी: वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका
२१ जानेवारी: भारत विरुद्ध मलेशिया
२२ जानेवारी: बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड
२२ जानेवारी: इंग्लंड विरुद्ध यूएसए
२२ जानेवारी: न्यूझीलंड विरुद्ध सामोआ
२२ जानेवारी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध आशिया पात्रता
२२ जानेवारी: पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड
२२ जानेवारी: दक्षिण आफ्रिका विरुद्ध आफ्रिका पात्रता
२३ जानेवारी: मलेशिया विरुद्ध वेस्ट इंडिज
२३ जानेवारी: भारत विरुद्ध श्रीलंका
सुपर सिक्सचं वेळापत्रक संघ निश्चित झाल्यावर
१ फेब्रुवारी हा उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस आहे आणि ३ फेब्रुवारी हा अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.