मोठा गेम झाला! India vs Sri Lanka टाय झालेल्या मॅचमध्ये Super Over खेळवता आली असती, पण...

IND vs SL Tied Match: भारतीय संघाला श्रीलंका दौऱ्यातील पहिल्या वन डे सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले. या सामन्यात Super Over का खेळवली गेली नाही, असा प्रश्न अनेकांना पडला होता अन् त्याचे चकित करणारे उत्तर समोर आले आहे.
India vs Sri Lanka Tie Match
India vs Sri Lanka Tie Match esakal
Updated on

India vs Sri Lanka 1st ODI Super Over: श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाला वन डे मालिकेत २-० अशी हार मानावी लागली. श्रीलंकेने २७ वर्षांनंतर भारताविरुद्ध वन डे मालिका जिंकली. पण, या मालिकेतील पहिल्या सामन्याची बरीच चर्चा झाली, कारण हा सामना टाय अर्थात बरोबरीत सुटला होता. तरीही अम्पायर्सनी Super Over का खेळवली नाही, असा प्रश्न तेव्हा सर्वांनाच पडला. त्याचे उत्तर आता समोर आले आहे आणि ते ऐकून तुम्ही अचंबित व्हाल...

त्या सामन्यात नेमकं काय घडलेलं?

२ ऑगस्टला खेळवण्यात आलेल्या पहिल्या वन डे सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करून ८ बाद २३० धावा केल्या होत्या. पथूम निसंका ( ५६) व दुनिथ वेल्लालागे ( ६७*) यांनी अर्धशतकी खेळली केली होती. भारताकडून रोहित शर्मा ( ५८), अक्षर पटेल ( ३३) व लोकेश राहुल ( ३१) यांची चांगला खेळ केला. लोकेश मैदानावर असेपर्यंत भारत जिंकेल असे वाटत होते, परंतु भारताचा संपूर्ण संघ ४७.५ षटकांत २३० धावांत माघारी परतला. हा सामना बरोबरीत सुटल्याने सुपर होणं अपेक्षित होते, परंतु अम्पायरने निकाल टाय दिला...

India vs Sri Lanka Tie Match
Duleep Trophy Teams: रोहित शर्मा, विराट कोहली यांनी का फिरवली पाठ? हे आहे कारण

चूक काय झाली?

IND vs SL यांच्यातल्या पहिल्या लढतीत अम्पायर सुपर ओव्हर खेळवायला विसरल्याचे वृत्त समोर येत आहे. ESPNcricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार या सामन्यासाठी मैदानावरील पंच जोएल विल्सन आणि रवींद्र विमलासिरी यांच्यासह सामनाधिकारी रंजन मदुगले, टीव्ही पंच पॉल रीफेल आणि चौथे पंच रुचिरा पलियागुरुगे यांनी वन डे सामन्यात टाय झाल्यानंतरच्या नियमात गोंधळ केला. वन डे सामन्याच्या प्लेइंग कंडिशनचा त्यांनी चुकीचा अर्थ लावल्याची कबुली दिली आहे.

या मालिकेत SLC आणि BCCI यांच्यातील सामंजस्य करारामुळे या दौऱ्यासाठी सुपर ओव्हर खेळण्याची परवानगी नव्हती का, याबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. पण, दुसऱ्या किंवा तिसऱ्या सामन्यात बरोबरीची परिस्थिती उद्भवली तर सुपर ओव्हर होईल, असे ठरवले गेले.

India vs Sri Lanka
India vs Sri Lankaesakal

नियम काय सांगतो?

आयसीसीने डिसेंबर २०२३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या वन डे सामन्याच्या प्लेइंग कंडिशनच्या नवीन नियमात असे म्हटले होते की, "दोन्ही डाव पूर्ण झाल्यानंतर संघांची धावसंख्या समान असल्यास, सुपर ओव्हर खेळली जाईल. सुपर ओव्हरही टाय झाल्यास ही प्रक्रिया सुरू राहील. नंतर अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय विजेता ठरत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर खेळणे किंवा पूर्ण करणे शक्य नसेल तर सामना बरोबरीत राहील.

मदुगले, विल्सन आणि विमलासिरी यांनी सुपर ओव्हर न होण्यामागील कोणत्याही विशिष्ट कारणावर लगेच चर्चा केली नाही. पण, नंतर उर्वरित दोन वन डे सामन्यांमध्ये आणखी एक बरोबरी झाल्यास ते सुपर ओव्हर सक्रिय करतील, असे सामना अधिकाऱ्यांनी ठरवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.