Accident Updates : Musheer Khan च्या गाडीचा भीषण अपघात, मेडिकल रिपोर्ट समोर; पाहा धडकी भरवणारे Photos

Musheer Khan Irani Cup : मुंबईचा टॅलेंटेड खेळाडू मुशीर खान याच्या गाडीचा शुक्रवारी भीषण अपघात झाला आणि त्या अपघाताचे फोटो समोर आले आहेत.
Musheer Khan
Musheer Khanesakal
Updated on

Musheer Khan road accident pics : मुंबईचा युवा फलंदाज मुशीर खान याच्या गाडीचा शुक्रवारी उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात झाला. त्यामुळे त्याला आता १६ आठवडे विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मुशीर खानला आता १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या इराणी चषक सामन्याला आणि रणजी करंडक स्पर्धेच्या काही लढतींना मुकावे लागणार आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार मुशीर, त्याचे वडील नौशाद आणि आणखी दोघं गाडीतून आझमगड येथून लखनौसाठी प्रवास करत होते. त्यांची गाडी डिव्हायडरवर आदळली आणि ३-४ वेळा पटली खाल्ली. यमुना एक्स्प्रेसवे येथे हा अपघात झाला.

मुशीरचे वडील आणि अन्य दोन लोकांना थोडसं खरचटलं आहे, परंतु मुशीरच्या मानेला दुखापत झाली आहे आणि त्याला तातडीने नजीकच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्याला १६ आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आणि कदाचीत त्याच्या मानेला फ्रॅक्चर झाला असावा. पुढील उपचारासाठी तो रविवारी मुंबईत विमानाने परतणार आहे.

Musheer Khan
SL vs NZ 2nd Test : न्यूझीलंड ८८ धावांत तंबूत, श्रीलंकेकडे ५०० पार आघाडी; Prabath Jayasuriya ची आर अश्विनच्या विक्रमाशी बरोबरी

''काल रात्री त्याच्या गाडीचा अपघात झाला आणि तो इराणी चषक सामन्यात नाही खेळणार. तो रविवारी मुंबईत येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची वैद्यकिय टीम त्याच्या दुखापतीची पाहणी करणार आहे. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होणार आहे,''असे MCA च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Musheer Khan
Musheer Khan esakal

मुंबईचा संघ मुंबईहून लखनौच्या दिशेने रवाना झाला आहे आणि मुशीर आझमगडहून संघात दाखल होणे अपेक्षित होते. MCA ने मुशीरला मुंबईत येण्यास सांगितले होते, परंतु त्याच्या वडिलांनी त्याला आझमगड येथे सराव करता यावा, यासाठी विनंती केली होती. मुंबईच्या संघ व्यवस्थापनाने ही विनंती मान्य केली.

Musheer Khan
ऋतुराज गायकवाड Vs Ajinkya Rahane! श्रेयस, इशान, शार्दूल, पृथ्वी हेही भिडणार; वाचा जबरदस्त सामना केव्हा कुठे रंगणार

रणजी करंडक स्पर्धेचा गतविजेता मुंबईचा संघ १ ते ५ ऑक्टोबर या कालावधीत शेष भारताविरुद्ध खेळणार आहे. मुंबईच्या संघाने अजून मुशीरच्या जागी कोणाची निवड केलेली नाही. मुशीरने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत भारतासाठी दमदार कामगिरी केली होती. त्यानंतर त्याने रणजी करंडक स्पर्धेत पहिले द्विशतक झळकावले. फायनलमध्ये विदर्भ संघाविरुद्ध त्याने दुसऱ्या डावात शतक झळकावून मुंबईला ४२ वे जेतेपद जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ५० हून अधिक सरासरीने ७०० हून अधिक धावा केल्या आहेत.

Medical bulletin
Medical bulletinesakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.