South Africa vs India 2nd T20I: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात दुसरा टी२० सामना रविवारी जिगेबेहरा येथील सेंट जॉर्ज पार्क स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यात भारताने १२५ धावांचे माफक आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग दक्षिण आफ्रिका सहज करतील असे वाटत होते.
मात्र, वरुण चक्रवर्तीने कमालीची गोलंदाजी केली आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या सर्वात भरवशाच्या हेन्रिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर या फलंदाजांनाही लागोपाठ बाद केले.