Ranji Trophy : रणजी ट्रॉफी राहणार महाराष्ट्रातच! विदर्भच्या पोट्ट्यांनी मध्य प्रदेशला पाचव्या दिवशी पाजले पाणी, गाठली फायनल

रणजी ट्रॉफी 2023-24 हंगामातील पहिल्या उपांत्य फेरीत विदर्भच्या पोट्ट्यांनी मध्य प्रदेशचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
Ranji Trophy Vidarbha beat Madhya Pradesh by 62 runs and reach the final Marathi News
Ranji Trophy Vidarbha beat Madhya Pradesh by 62 runs and reach the final Marathi NewsEsakal
Updated on

Ranji Trophy Vidarbha beat Madhya Pradesh : रणजी ट्रॉफी 2023-24 हंगामातील पहिल्या उपांत्य फेरीत विदर्भच्या पोट्ट्यांनी मध्य प्रदेशचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर झालेल्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी विदर्भाने 62 धावांनी विजय मिळवला.

मुंबईने उपांत्य फेरीत तामिळनाडूचा 2 मध्ये पराभव केला. अंतिम सामन्यात दोन वेळचा चॅम्पियन विदर्भ संघ 41 वेळा चॅम्पियन मुंबईशी भिडणार आहे. म्हणजे यावेळी रणजी ट्रॉफी ही महाराष्ट्रातच राहणार.

Ranji Trophy Vidarbha beat Madhya Pradesh by 62 runs and reach the final Marathi News
WPL 2024 MIW : मुंबई इंडियन्सच्या इस्माईलने रचला इतिहास; टाकला महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू

विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यातील सामना खूपच रोमांचक झाला आहे. विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विदर्भाचा संपूर्ण संघ पहिल्या डावात 170 धावांवर आटोपला. यानंतर मध्य प्रदेशने पहिल्या डावात 252 धावा करत आघाडी घेतली.

पण विदर्भाने दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करत सामन्यात पुनरागमन केले. यश राठोडच्या 141 धावांच्या खेळीच्या जोरावर विदर्भाने दुसऱ्या डावात 402 धावा केल्या. अशाप्रकारे मध्य प्रदेशला 321 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. 321 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना मध्य प्रदेशचा संघ दुसऱ्या डावात 258 धावांत गारद झाला.

Ranji Trophy Vidarbha beat Madhya Pradesh by 62 runs and reach the final Marathi News
WPL 2024 MIW : मुंबई इंडियन्सच्या इस्माईलने रचला इतिहास; टाकला महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू

विदर्भ संघ 2017-18 आणि 2018-19 मध्ये चॅम्पियन झाला होता. 41 वेळा चॅम्पियन मुंबई संघाने शेवटचे 2015-16 मध्ये विजेतेपद पटकावले होते. या हंगामात दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी केली असून केवळ 1-1 सामने गमावले आहेत.

विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यातील उपांत्य फेरीबद्दल सांगायचे तर यश राठोड हा सामनावीर ठरला. त्याने दुसऱ्या डावात 141 धावांची खेळी केली. विदर्भाला 402 धावांपर्यंत मजल मारण्यास मदत केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()