Ranji Trophy : विदर्भ उपांत्य फेरीच्या मार्गावर ; रणजी करंडक, कर्नाटकविरुद्ध २२४ धावांची आघाडी

कर्नाटकविरुद्धच्या रणजी करंडक उपांत्यपूर्व लढतीत आणखी दोन दिवसांचा खेळ शिल्लक असला, तरी पहिल्या डावात मिळालेल्या १७४ धावांच्या निर्णायक आघाडीमुळे यजमान विदर्भाने पुन्हा एकदा उपांत्य फेरीच्या मार्गावर दमदार वाटचाल केली आहे.
Ranji Trophy
Ranji Trophysakal
Updated on

नागपूर : कर्नाटकविरुद्धच्या रणजी करंडक उपांत्यपूर्व लढतीत आणखी दोन दिवसांचा खेळ शिल्लक असला, तरी पहिल्या डावात मिळालेल्या १७४ धावांच्या निर्णायक आघाडीमुळे यजमान विदर्भाने पुन्हा एकदा उपांत्य फेरीच्या मार्गावर दमदार वाटचाल केली आहे. दुसऱ्या डावात बिनबाद ५० धावा करून विदर्भाने आघाडी २२४ पर्यंत वाढवली आहे.

विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानाच्या खेळपट्टीचे सध्याचे स्वरूप पाहता अजूनही फलंदाजी आव्हानात्मक नाही. त्यामुळे विदर्भ संघ जास्तीत जास्त धावा करण्याच्या उद्येशानेच खेळ करेल, यात शंका नाही. कर्नाटकचा विचार केला तर सामना रंगतदार करण्यासाठी पाहुण्या संघातील गोलंदाजांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. उद्या, विदर्भाच्या फलंदाज किती धावांची भर घालतात, यावरून या सामन्याचा निकाल पहिल्या डावातील आघाडीवर की निर्णायक लागेल, हे स्पष्ट होईल.

Ranji Trophy
Ranji Trophy : मुंबईचा क्रिकेट संघ ५७ धावांनी पुढे ; शाश्‍वत, विष्णू यांची शतके

सकाळी आर. समर्थ आणि निकीन जोस यांनी कर्नाटकचा डाव सुरू केला. दोघेही आत्मविश्वासाने खेळत होते. मात्र, हर्ष दुबेचा एक चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या समर्थला पंचांनी पायचीत ठरविले. चेंडू डावा पायाच्या अंगठ्याला लागल्यावर पहिल्या स्लीमपमध्ये ध्रुव शोरेने पकडला होता. यावर विदर्भाच्या खेळाडूंनी जोरदार अपिल केले आणि पंचांनी बराच वेळ घेत बोट वर उचलले. यावर समर्थने देहबोलीतून नाराजीही व्यक्त केली. मनीष पांडेने आक्रमक सुरुवात केली. मात्र, यश ठाकूरने एका अप्रतिम इनस्विंगरवर त्याचा त्रिफळा उडविला. त्या वेळी पांडेलाही काही क्षण विश्वास बसला नाही. दोन धक्के बसल्याने कर्नाटकची धावांची गती मंदावली होती. त्यानंतर दोन अर्धशतकी भागीदारी झाल्याने कर्नाटकला अडीचशे धावांचा पल्ला गाठता आला. प्रथम निकीन जोस व हार्दिक राजने पाचव्या गड्यासाठी ५०; तर निकीन व एस. शरथने सहाव्या गड्यासाठी ५३ धावांची भागीदारी केली.

जोस-राज ही जोडी धोकादायक होत असतानाच यश ठाकूरच्या एका चेंडूवर जोसच्या बॅटची कड घेऊन आलेला झेल पहिल्या स्लीपमध्ये ध्रुव शोरेने उजव्या बाजूला झेपावत जमिनीलगत पकडला. शरथ मात्र, कमनशिबी ठरला. चहापानाच्या ठोक्याला सरवटेचा एक चेंडू डाव्या बाजूला मारण्याच्या नादात शरथचा झेल यष्टीमागे वाडकरने दुसऱ्या प्रयत्नात झेलला. या निर्णयावर शरथ फारसा खूष दिसला नाही. शरथ बाद झाला, त्या वेळी कर्नाकटची स्थिती ६ बाद २५१ अशी होती; मात्र तीनशे धावांच्या आत डाव गुंडाळला जाईल, अशी स्थिती नव्हती.

धीरज गौडा बाद झाल्यावर निकीन जोसने व्ही. विजयकुमारच्या साथीने २९ धावा जोडल्या; मात्र शतकापासून आठ धावा दूर असताना सरवटेने जोसला पायचीत केले. पुढच्याच षटकात उमेश यादवने लागोपाठ दोन चेंडूवर विजयकुमार व कौशिकला बाद करून कर्नाटकचा पहिला डाव २८६ धावांवर गुंडाळला. संक्षिप्त धावफलक ः विदर्भ पहिला डाव ४६०, कर्नाटक पहिला डाव सर्वबाद २८६ (आर. समर्थ ५९, के. व्ही. अनीश ३४, मनीष पांडे १५, हार्दिक राज २३, एस. शरथ २९, व्ही. विजयकुमार २३, यश ठाकूर ३-४८, आदित्य सरवटे ३-५०, उमेश यादव २-५४, हर्ष दुबे १-६९, आदित्य ठाकरे १-५१) विदर्भ दुसरा डाव १४ षटकांत बिनबाद ५० (अथर्व तायडे खेळत आहे २१, ध्रुव शोरे खेळत आहे २९)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.