Guatam Gambhir selected 'Shahenshah' of cricket : भारताचा माजी सलामीवीर आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला दिल्ली प्रीमिअर लीग दरम्यान काही मजेशीर प्रश्न विचारले गेले आणि त्यात त्याने युवराज सिंग याचा बादशाह आणि सचिन तेंडुलकरचा दबंग असा उल्लेख केला. त्याला बरीच प्रश्न विचारली गेली आणि त्यापैकी एकाही उत्तरांमध्ये त्याने महेंद्रसिंग धोनी व रोहित शर्मा यांचे नाव घेतले नाही. दिल्ली प्रीमिअर लीगच्या सोशल मीडियावर गौतमचा हा व्हिडीओ पोस्ट केला गेला आहे. यात 'Bollywood x Cricket' असा एक मजेशीर खेळ खेळला गेला. यामध्ये भारतीय संघातील कोणत्या खेळाडूसाठी बॉलिवूडमधील टायटल योग्य बसतं हे त्याला विचारले गेले.
या खेळात गौतम गंभीरने शेहनशाह म्हणून विराट कोहलीची निवड केली... जसप्रीत बुमराह याला सर्वात महत्त्वाचे स्थान देऊन गंभीरने त्याला 'खिलाडी' म्हटले. दरम्यान गौतमने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्मा यांचे नाव न घेतल्याने अनेकांना आश्चर्य वाटले.
बादशाह - युवराज सिंग
अँग्री यंग मॅन - मी स्वतः
दबंग - सचिन तेंडुलकर
शेहनशाह - विराट कोहली
खिलाडी - जसप्रीत बुमराह... खिलाडी हा या सर्वांपेक्षा महत्त्वाचा असतो.
मी. परफेक्टनिस्ट - राहुल द्रविड
गब्बर - शिखर धवन
टायगर - सौरव गांगुली
भारतीय संघ ब्रेकनंतर बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी आजपासून टीम इंडिया चेन्नईत सरावाला सुरुवात करणार आहे. चेन्नईतील एम चिदंबरम स्टेडियमवर हा सामना होणार आहे, तर कानपूर येथे दुसरा कसोटी सामना आयोजित केला गेला आहे. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघाची ही पहिलीच कसोटी मालिका असणार आहे.
पहिल्या कसोटीसाठीचा भारतीय संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.