T20 त इतिहास घडला! १,२,३ Super Over चा थरार रंगला, भारतातील सामन्याने वेधले जगाचे लक्ष, Video

T20 Three Super over: ट्वेंटी-२० क्रिकेट इतिहासातील सर्वात थरारक सामना आज जगाने पाहिला. ४० षटकांत बरोबरी झाल्यानंतर निकालासाठी तब्बल ३ सुपर ओव्हर खेळाव्या लागल्या...
maharaja trophy
maharaja trophy esakal
Updated on

MADNESS IN MAHARAJA T20 TROPHY- ट्वेंटी-२० क्रिकेटच्या इतिहासात कधी असा सामना पाहिला नसेल जो आज भारतात पाहायला मिळाला. महाराजा ट्वेंटी-२० ट्ऱॉफी स्पर्धेत हुबळी टायगर्स विरुद्ध बंगळुरू ब्लास्टर्सची लढत निर्धारित ४० षटकांत Tie झाला आणि त्यानंतर निकालासाठी तब्बल ३ Super Over खेळवावी लागली..

४० षटकांत - Ti

पहिली Super Over - Tie

दुसरी Super Over - Tie

क्रिकेटमध्ये प्रथमच तीन सुपर ओव्हर खेळवल्या गेल्या. first time three Super Over... हुबळी टायगर्सने प्रथम फलंदाजी करताना १६४ धावा केल्या. मोहम्मद तहा ( ३१), कर्णधार मनिष पांडे ( ३३), अनीश्वर गौतम ( ३०) आणि मनवथ कुमार ( २८) यांनी संघाच्या धावसंख्येत हातभार लावला. प्रत्युत्तरात बंगळुरूने शेवटच्या चेंडूवर विकेट गमावली आणि त्यांच्याही १६४ धावा झाल्या.

कर्णधार मयांक अग्रवालने ३४ चेंडूंत ५४ धावांची खेळी केली. सुरज अहुजा ( २६) व ज्ञानेश्वर नवीन ( २३) यांनी शेवटपर्यंत लढत दिली. १ चेंडूंत १ धाव हवी असताना बंगळुरूला क्रांती कुमार रन आऊट झाला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. बंगळुरूने Super Over मध्ये १ बाद १० धावा केल्या आणि हुबळीलाही १० धावाच करता आल्या.

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये हुबळीच्या ८ धावांचा पाठलाग करताना बंगळुरूलाही १ बाद ८ धावांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे मॅच तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेली. बंगळुरूच्या मानवंत कुमारने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून संघाला १ बाद १२ धावांपर्यंत पोहोचवले. पण, हुबळीच्या क्रांती कुमारने शेवटच्या चेंडूवर चौकार खेचून संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. हुबळीने बिनबाद १३ धावा करून विजय निश्चित केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.