Viral Video: कानपूरमध्येही Virat Kohli ची क्रेझ! चक्क ग्राऊंड स्टाफ सदस्यच अचानक जवळ येत पाया पडला

Virat Kohli's Feet Touched by Groundstaff Member in Kanpur: भारत विरुद्ध बांगलादेश संघातील कानपूरला होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ग्राऊंड स्टाफमधील एक सदस्य विराट कोहलीच्या पाया पडताना दिसला होता. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Virat Kohli Video
Virat Kohli VideoSakal
Updated on

कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (२७ सप्टेंबर) सुरू झाला आहे. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. सामन्याच्याआधी टॉसला देखील पावसामुळे जवळपास तासभर उशीर झाला होता.

त्यानंतर पहिल्या सत्रानंतरही पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे या सामन्यात ग्राऊंड स्टाफलाही सतर्क रहावे लागले आहे. याचदरम्यानचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Virat Kohli Video
IND vs BAN 2nd Test : बॅटिंग पिचवर Rohit Sharma ने गोलंदाजी का करायचं ठरवलं? त्या एका गोष्टीमुळे Kuldeep Yadav संघाबाहेर राहिला

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की सामन्यापूर्वी ग्राऊंड स्टाफमधील सदस्य ग्राऊंड झाकण्यासाठीचे कव्हर्स घेऊन उभे आहेत. त्याचवेळी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली बॅट घेऊन तिथून जात होता.

त्यावेळी अचानक ग्राऊंड स्टाफमधील एक सदस्य त्याच्या जवळ आला आणि तो विराटच्या पाया पडला. ते पाहून एका क्षणासाठी विराटही शॉक झाला होता, पण त्यानंतर त्याने ग्राऊंड स्टाफमधील सदस्याकडून मिळालेला आदर स्विकारला.

दरम्यान, कानपूरमध्ये विराटकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्याला चेन्नईमध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत खास काही करता आले नव्हते. तो पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात १७ धावा करून बाद झाला होता.

कानपूरमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कानपूरमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणारा रोहित १९६४ नंतरचा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे.

Virat Kohli Video
IND vs BAN: आकाश दीपचा DRS चा आग्रह अन् कॅप्टन रोहितही रिव्ह्यू पाहून शॉक, पाहा Viral Video

दरम्यान, कानपूर कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काहीही बदल झालेला नाही. भारताच्या संघव्यवस्थापनाने चेन्नई कसोटीत खेळवलेले ११ खेळाडूच दुसऱ्या कसोटीसाठीही कायम केले आहेत.

भारताने चेन्नईत झालेला पहिला कसोटी सामना २८० धावांनी जिंकून १-० अशी मालिकेत आघाडी घेतली होती. त्यामुळे आता जर भारताने कानपूरमध्ये विजय मिळवला, तर ते २-० ने मालिका जिंकतील. बांगलादेशला मालिका पराभव टाळण्यासाठी कानपूरमध्ये विजय आवश्यकच आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.