New Zealand tour India : भारताचा प्रशिक्षक न्यूझीलंडला कसोटी मालिकेत मदत करणार

New Zealand vs Afganistan test match: अफगाणिस्तान कसोटी सामन्याआधी न्यूझीलंडने दोन प्रशिक्षकांची नियुक्ती केली आहे
vikram rathore
vikram rathoreesakal
Updated on

Vikram Rathour: भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांची न्यूझीलंडच्या सपोर्ट स्टाफमध्ये निवड केली गेली आहे. न्यूझीलंड -अफगाणिस्तान यांच्यातला एकमेव कसोटी सामना भारतात ९ सप्टेंबरपासून सुरू होतोय. राठोड या सामन्यात न्यूझीलंडचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहतील.

न्यूझीलंडचा कसोटी संघ ग्रेटर नोएडा येथे कसोटी सामना खेळण्यासाठी भारतात आला आहे. न्यूझीलंड-अफगाणिस्तान कसोटी सामना ९ सप्टेंबरपासून सुरू होणार असून त्यानंतर श्रीलंकेत दोन कसोटी सामने होणार आहेत. ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडचा संघ पुन्हा भारत दौऱ्यावर येईल, तेव्हा ते भारताविरुद्ध १६ ऑक्टोबरपासून तीन कसोटी सामने खेळणार आहेत.

vikram rathore
Musheer Khan : २१ चेंडूंत कुटल्या ९४ धावा! Duleep Trophy मध्ये मुशीर खानने मोडला तेंडुलकरचा मोठा विक्रम

विक्रम राठोड यांनी १९९६ मध्ये भारतीय संघासाठी सलामी फलंदाज म्हणून सहा कसोटी सामने खेळले आहेत. त्यांची भारतीय क्रिकेट संघामध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नोव्हेंबर २०२१ मध्ये नियुक्ती करण्यात आली. संघातील यशाच्या आधारावर त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ २०२३चा वन डे वर्ल्ड कप खेळला आणि २०२४ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघ विश्वविजेता बनला.

विक्रम राठोड यांच्यासोबतच श्रीलंकेचे माजी फिरकी गोलंदाज रंगना हेराथ हे देखील न्यूझीलंडच्या प्रशिक्षक स्टाफमध्ये सामील झाले आहेत. पुढील तीन कसोटी सामन्यांसाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. पाकिस्तानचे माजी फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताक यांच्या जागी रंगना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रंगना यांनी श्रीलंकेसाठी ९३ कसोटी सामने खेळले असून ४३३ विकेट्स घेतल्या आहेत.

vikram rathore
Shubman Gill : शुभमन गिल चेंडू सोडायला गेला अन् उडाला त्रिफळा; Rishabh Pant ची भन्नाट कॅच Video

न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी नवीन प्रशिक्षकांचे स्वागत केले आहे. "आमच्या कसोटी संघात रंगना आणि विक्रम यांचा समावेश करताना आम्हाला आनंद होत आहे. क्रिकेटविश्वात या दोघांचाही खूप आदर आहे. आमचे खेळाडू त्यांच्याकडून शिकण्यासाठी उत्सुक आहेत," गॅरी स्टेड म्हणाले.

“आमच्या तीन डावखुऱ्या फिरकीपटू एजाझ, मिच आणि रचिनसाठी, पुढील तीन कसोटी सामन्यांमध्ये रंगनांसोबत काम करण्याची संधी मिळणे खूप फायदेशीर ठरेल. रंगना यांनी श्रीलंकेतील गले येथे १०० हून अधिक कसोटी विकेट्स घेतले आहेत, जे श्रीलंकेविरुद्धच्या आमच्या दोन कसोटी सामन्यांचे ठिकाण आहे आणि त्यामुळे रंगना यांचा त्या मैदानावरील अनुभव आमच्या कामी येईल.”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.