Vinesh Phogat Raksha Bandhan: 'आधी १० रुपये अन् आता संपूर्ण आयुष्याची कमाई...', विनेशने उडवली भावाची मस्करी

Vinesh Phogat celebrated Raksha Bandhan: देशभरात रक्षाबंधन साजरे होत असून विनेश फोगटनेही तिच्या भावासह हा सण साजरा केला.
Vinesh Phogat Raksha Bandhan
Vinesh Phogat Raksha BandhanSakal
Updated on

Vinesh Phogat Video: सोमवारी (१९ ऑगस्ट) भारतात रक्षाबंधनाचा सण साजरा होत आहे. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा आणि त्यांच्या नात्यात गोडवा आणणारा हा सण आहे. त्यामुळे खेळाडूही आपापल्या भावंडांसोबत हा सण साजरा करत आहेत.

भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटनेही तिच्या भावासोबत तिच्या गावी बलाली येथे हा सण साजरा केला. यादरम्यान, तिचा एक मजेशीर व्हिडिओही व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये तिचा भाऊ हरविंदरने ओवाळणी म्हणून दिलेल्या ५०० रुपयांच्या नोटांचा बंडल दाखवत आहे. तसेच तिने म्हटले आहे की 'हे पैसे... मी आता जवळपास ३० वर्षांची झालेय. आत्तापर्यंत १० रुपये आणि गेल्यावर्षी त्याने मला ५०० रुपये दिले होते. पण यावेळी माझ्या हातात त्याची आत्तापर्यंतची आयुष्यभराची कमाई आहे. सर्व भाऊ आणि बहि‍णींना शुभेच्छा.'

Vinesh Phogat Raksha Bandhan
Vinesh Phogat: 'विनेशने जीव गमावला असता...', फायनलच्या आदल्या रात्री काय झालेलं? कोचकडून खळबळजनक खुलासा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.