वन डेमध्ये ४९९ धावा! दोन भारतीय फलंदाजांनी झळकावले द्विशतक, इंग्लंड अन् Prithvi Shaw चा मोडला विक्रम

Vinoo Mankad Trophy 2024 : वन डे क्रिकेटमध्येही आता ट्वेंटी-२० स्टाईल फलंदाजी पाहायला मिळतेय.. त्यामुळेच पूर्वी ५० षटकांत ३०० धावा झाल्या तरी खूप वाटायच्या, परंतु आता ४०० धावाही कमीच वाटू लागल्या आहेत.
india cricket
india cricketesakal
Updated on

Rajastan vs Arunachal Pradesh : वन डे क्रिकेटमध्येही आता ट्वेंटी-२० स्टाईल फलंदाजी पाहायला मिळतेय.. त्यामुळेच पूर्वी ५० षटकांत ३०० धावा झाल्या तरी खूप वाटायच्या, परंतु आता ४०० धावाही कमीच वाटू लागल्या आहेत. आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधअये २०२२ मध्ये इंग्लंडने नेदरलँड्सविरुद्ध ४ बाद ४९८ धावांचा डोंगर उभा केला होता. दुसऱ्या ( ६ बाद ४८१ वि. ऑस्ट्रेलिया) व तिसऱ्या ( ३ बाद ४४४ धावा वि. पाकिस्तान) क्रमांकावरही इंग्लंडच आहे. लिस्ट एक क्रिकेटमध्ये तामिळनाडूने २०२२ मध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्ध ५०६ धावांची विक्रमी धावसंख्या उभी केली होती.

आता १९ वर्षांखालील विनू मांकड क्रिकेट स्पर्धेतही अशीच आतषबाजी पाहायला मिळाली. राजस्थान संघाने ३ बाद ४९९ धावांचा डोंगर उभा केला आणि अरुणाचल प्रदेशवर ३३८ धावांनी विजय मिळवला. या वन डे सामन्यात राजस्थानच्या दोन फलंदाजांनी द्विशतक झळकावलं. तामिळनाडूनंतर आता लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम राजस्थानच्या नावावर आहे. राजस्थानने इंग्लंडचा विक्रम मोडला.

india cricket
IND vs AUS : Rohit Sharma ची माघार, मग कोण असेल टीम इंडियाचा कर्णधार? ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी मोठा पेच

सचिन शर्मा आणि ऋषभ यादव या सलामीवीरांना अपयश आले. त्यानंतर कर्णधार कार्तिक शर्मा आणि मोहम्मद अनस या दोघांच्या द्विशतकांच्या जोरावर राजस्थान संघाने ५० षटकांत ३ बाद ४९९ धावा केल्या. मोहम्मद अनसने १६१ चेंडूत २४७ धावांची खेळी केली. कार्तिक शर्मानेही १३१ चेंडूत नाबाद २२५ धावा केल्या. अनसने आपल्या खेळीत २५ चौकार आणि १२ षटकार मारले, तर कार्तिकने २२ चौकार आणि १२ षटकारांची आतषबाजी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४८४ धावांची भागीदारी केली. प्रत्युत्तरात अरुणाचल प्रदेशचा संपूर्ण संघ ४३.३ षटकांत १६१ धावांत तंबूत परतला. राहुल रावतने सर्वाधिक ५२ धावा केल्या, तर सागरने ३३ धावांची खेळी केली. तोषितने ६.३-०-१३-५ अशी स्पेल टाकली. नावेद खानने दोन विकेट्स घेतल्या.

लिस्ट ए क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमात मोहम्मद अनासने पृथ्वी शॉला मागे टाकले आहे. शॉने वन डे चषकात समरसेटकडून खेळताना नॉर्थम्प्टनशायरविरुद्ध २४४ धावा केल्या होत्या. अनसने त्याच्यापेक्षा 3 धावा जास्त केल्या. यासह अनस आता लिस्ट ए च्या एका डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या क्रमांकावर नारायण जगदीशन आहे ज्याने २०२२ मध्ये अरुणाचल विरुद्ध २७७ धावांची खेळी खेळली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.