16 Sixes, 48 Fours: वत्सल पटेलची आतषबाजी अन् संघाच्या ४५० धावा, ३४१ धावांनी जिंकला सामना

Vinoo Mankad Trophy : आक्रमक फटकेबाजीची परंपरा आता देशांतर्गत क्रिकेटमध्येही पाहायला मिळतेय आणि विनू मंकड ट्रॉफीत सौराष्ट्रच्या संघाने ४ बाद ४५० धावांचा डोंगर उभा केला आणि अरुणाचल प्रदेशला १०९ धावांवर गुंडाळून मोठा विजय मिळवला.
Vinoo Mankad Trophy
Vinoo Mankad Trophyesakal
Updated on

Vinoo Mankad Trophy Saurashtra: रोहित शर्मा अँड टीमची आक्रमकता युवा पिढीतही पाहायला मिळतेय... सध्या सुरू असलेल्या विनू मंकड ट्रॉफीत सौराष्ट्रच्या फलंदाजांनी वादळी खेळी करताना अरुणाचल प्रदेशविरुद्ध ४ बाद ४५० धावांचा डोंगर उभा केला. सौराष्ट्रच्या सर्वच फलंदाजांनी आक्रमक फटकेबाजीच केली होती. त्यात सहाव्या क्रमांकावर आलेल्या वत्सल पटेलची आतषबाजी पाहण्यासारखी होती. त्याने २९ चेंडूंत ८७ धावा कुटल्या.  

सौराष्ट्रच्या संघाची सुरुवात काही खास झाली नाही. त्यांचा सलामीवीर जैद बमभनिया गोल्डन डकवर माघारी परतला. पण, मनिष यादव आणि यष्टीरक्षक फलंदाज युवराज गोहिल यांनी २०८ धावांची भागीदारी केली. गोहलिने ८९ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ८४ धावांची खेळी केली. यादवने शतक पूर्ण केले आणि त्याला चुबिंग चेगेने बाद केले. यावदने १०७ चेंडूंत १३ चौकार व ३ षटकारांसह १२२ धावा केल्या.  

Vinoo Mankad Trophy
PAK vs ENG 1st Test : ‘Root’ मजबूत! इंग्लंडच्या जो रूटने पाकिस्तानविरुद्ध रचला इतिहास; टॉफ फाईव्हमध्ये एकही भारतीय नाही

मर्विन जावियाने अरुणाचल प्रदेशच्या गोलंदाजांना झोडले. त्याने ३४ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ५९ धावांची खेळी केली. त्याने जय रवालियासोबत ४३ चेंडूंत ७८ धावांची भागीदारी केली. रवालिया आणि वत्सल पटेल यांनी नंतर ही फटकेबाजी पुढे सुरू ठेवली. पटेलने सलग पाच षटकार खेचूल संघाला चारशेपार पोहोचवले. रवालिया व पटेल यांनी ५१ चेंडूंत १३७ धावांची अभेद्य भागिदारी केली. रवालियाने १० चौकार व २ षटकार खेचून ४० चेंडूंत ७२ धावा केल्या. वत्सलने २९ चेंडूंत ३ चौकार व ९ षटकारांसह ८७ धावा कुटल्या. सौराष्ट्रच्या संघाने एकूण १६ षटकार व ४८ चौकारांची आतषबाजी केली.

अरुणाचल प्रदेशचा संपूर्ण संघ ३२.१ षटकांत १०९ धावांत तंबूत परतला. त्यांच्या संघाकडून राहुल रावत ( ३९) व ताडो (२१) यांनीच चांगला खेळ केला. सौराष्ट्रच्या मौर्या घोंघरीने ५, जावियाने ३ व देविद्रसिंग झलाने २ विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.