झिंबू, झिंबू....! शाहिन आफ्रिदीने भर मैदानात Babar Azam ला चिडवले? Video viral

Fans speculated Shaheen Afridi mock Babar Azam after video goes viral: पाकिस्तानच्या एका कसोटी सामन्यातील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामुळे शाहिन आफ्रिदी बाबर आझमला डिवचतोय की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Shaheen Afridi Viral Video
Shaheen Afridi Viral VideoSakal
Updated on

Shaheen Afridi Viral Video: पाकिस्तान क्रिकेट संघाला शुक्रवारी (११ ऑक्टोबर) इंग्लंडविरुद्ध दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला इंग्लंडने एक डाव आणि ४७ धावांनी पराभूत केले.

या सामन्यातही पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझमला खास कामगिरी करता आली नाही. खरंतर बाबर गेल्या अनेक महिन्यांपासून फलंदाजी करताना संघर्ष करत आहे. त्याने २०२२ पासून कसोटीत एकही शतक केलेलं नाही.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही त्याने ३० आणि ५ धावांची खेळी केली होती. त्यामुळे सध्या त्याच्यावर टीका होत आहे. यातच आता एका व्हिडिओमुळे त्याला संघसहकारीपण चिडवायला लागलेत की काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

Shaheen Afridi Viral Video
WTC 2023-25 Final : पाकिस्तान संघावर दुहेरी संकट; इंग्लंडकडून हरले अन् भारताला टक्कर देण्याचे स्वप्नही भंगले

खरंतर बाबरला ट्रोल करताना अनेक सोशल मिडिया युझर्स झिम्बाबर किंवा झिंबू अशा नावाने त्याला बोलतात. कारण त्याने बऱ्याच धावा तुलनेने कमजोर असलेल्या झिम्बाब्वे संघाविरुद्ध केल्या आहेत.

दरम्यान, आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शाहिन शाह आफ्रिदी कसोटी सामन्यादरम्यान कोणालातरी आवाज देताना दिसत आहे. त्याच्या ओठांच्या हालचालींवरून तो झिंबू असं म्हणत असल्याचा कयास काही युझर्सने लावला आहे.

गेल्या काही दिवसात बाबर आणि शाहिन यांच्यातील संबंध चांगले नसल्याच्याही चर्चा झाल्या आहेत. त्यातच आता असा व्हिडिओ समोर आल्याने त्याबाबत आणखी चर्चा होत आहे. तथापि, हा एक व्हायरल व्हिडिओ असून या व्हिडिओमध्ये शाहिनने झिंबू हा शब्द वापरला आहे की नाही, याची पुष्टी सकाळ करत नाही.

Shaheen Afridi Viral Video
PAK vs ENG 1st Test : हाय रे किस्मत! पाकिस्तान, ५५६ धावा करूनही हरणारा जगातला पहिला संघ; इंग्लंडचा पराक्रम

जूनमध्ये झालेल्या टी२० वर्ल्ड कप पूर्वी शाहिनला पाकिस्तानच्या टी२० संघाच्या कर्णधारपदावरून हटवून अचानक बाबर आझमकडे ही जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हापासूनच त्यांच्यातील संबंध ताणले गेल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, टी२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यांना सुपर-८ मध्येही पोहचता आले नव्हते. त्यानंतर बाबर आझमनेही टी२० संघाचे कर्णधारपद सोडले आहे. त्याने यापूर्वी २०२३ वनडे वर्ल्ड कपनंतर वनडे आणि कसोटी संघाचेही कर्णधारपद सोडले होते.

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद ५५६ धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडने पहिला डाव ७ बाद ८२३ धावांवर घोषित केला आणि २६७ धावांची आघाडी घेतली. दुसर्‍या डावात पाकिस्तान संघ २२० धावांवर सर्वबाद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.