IND vs SL ODI: IPL वाला रूल है क्या! अम्पायरने वाईड देताच, भारतीय खेळाडूंचा एकमेकांशी संवाद Video Viral

India vs Sri Lanka Viral Video: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारतीय खेळाडूंमध्ये आयपीएलमधील नियमाबाबत मजेशीर संवाद चालल्याचे दिसले.
India vs Sri Lanka 1st ODI
India vs Sri Lanka 1st ODISakal
Updated on

India vs Sri Lanka 1st ODI Live Update: श्रीलंका विरुद्ध भारत संघात वनडे मालिकेला शुक्रवारी सुरूवात झाली आहे. कोलंबोला होत असलेल्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात एक मजेशीर घटना घडली.

या सामन्यात एका वाईड चेंडूवर भारतीय खेळाडूंमध्ये मजेशीर संवाद चालल्याचे दिसले. यावेळी खेळाडूंना आयपीएलचा नियमही आठवला होता.

झाले असे की १४ व्या षटकात शिवम दुबे गोलंदाजी करत होता. यावेळी त्याचा चौथा चेंडू श्रीलंकेचा सलामीवीर पाथम निसंकाच्या थायपॅडला स्पर्श करून गेला. यावेळी दुबे पायचीतसाठी रिव्ह्यु घ्यावा असं म्हणत होता, परंतु यष्टीरक्षक केएल राहुल यासाठी फारसा उत्सुक दिसला नाही.

India vs Sri Lanka 1st ODI
IND vs SL 1st ODI Live : १६९१ दिवसानंतर पहिली विकेट; रोहितच्या 'लाडक्या'ने संधीचं केलं सोनं

याचदरम्यान पंचांनी हा चंडू वाईड असल्याचा निर्णय दिला. यावेळी केएल राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा चर्चा करत होते, त्याचवेळी कोणीतरी आयपीएलवाला नियम आहे काय, अशी विचारणा केली. हा आवाज स्टम्प माईकमध्ये कैद झाला असून या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

यावेळी हा संवाद ऐकून समालोचकांनाही हसू आवरता आले नव्हते. त्यांनीच यामागील कारणही स्पष्ट केले. आयपीएलमध्ये पंचांनी वाईड दिल्यानंतर गोलंदाजी करणारा संघ त्यावरही रिव्ह्यू घेऊ शकतो. मात्र असा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाही.

India vs Sri Lanka 1st ODI
IND vs SL 1st ODI Weather Report: पहिल्या सामन्यावर काळे ढग! मॅच होणार रद्द? जाणून घ्या पावसाची टक्केवारी

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर कर्णधार रोहित शर्माने आजच्या सामन्यात शिवम दुबेला संधी देऊन सर्वांना आश्चर्यचकीत केले. या सामन्यात श्रीलंकेकडून निसंकाने चांगली सुरुवात केली होती.

मात्र त्याला इतर फलंदाजांकडून फारशी साथ मिळाली नाही. तरी शेवटचे अपडेट्स हाती आले तेव्हा श्रीलंकेने ४१ षटकात ६ बाद १७१ धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून पाथम निसंकाने सर्वाधिक ५६ धावा केल्या होत्या.

तसेच भारताकडून अक्षर पटेलने २ विकेट्स घेतल्या होत्या, तर मोहम्मद सिराज, शिवम दुबे, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

या सामन्यातून भारताकडून रोहित शर्मासह विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर या खेळाडूंचेही पुनरागमन झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.