Rohit Sharma: पुन्हा दिसला रोहितचा विसरभोळेपणा, ग्राऊंडवर जायचा रस्ताच विसरला? Viral Video

Rohit Sharma Viral Video: भारताचा वनडे आणि कसोटी कर्णधार रोहित शर्माचा विसरभोळा स्वभाव सर्वांनाच माहित झाला आहे. आता त्याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे.
Rohit Sharma Viral Video
Rohit Sharma Viral VideoSakal
Updated on

Rohit Sharma Video: भारताचा वनडे आणि कसोटी कर्णधार रोहित शर्माचा विसरभोळा स्वभाव सर्वांनाच माहित झाला आहे. तो अनेक गोष्टी विसरत असतो. त्याचे संघसहकारीपण त्याच्या या स्वभावाबद्दल सांगतात. तो एकदा नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय घ्यायचाय हे देखील विसरला होता.

आता पुन्हा एकदा त्याचा हा विसरभोळेपणा समोर आला आहे. भारतीय संघ सध्या बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळत आहे. यादरम्यानच रोहितचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात तो रस्ताच विसरल्याचे दिसत आहे.

Rohit Sharma Viral Video
IND vs NZ, Viral Video: सर्फराज खानच्या टणाटण उड्या, ऋषभ पंत काही लक्ष देईना; यात न्यूझीलंडचा किपरही गोंधळला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.