पाकिस्तानचा 'छोटा' बुमराह! वसीम अक्रमने शेअर केला Cute Video

Jasprit Bumrah: पाकिस्तानमधील एक छोटा मुलगा जसप्रीत बुमराहप्रमाणे गोलंदाजी करत असतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Young boy from Pakistan imitating Jasprit Bumrah Action
Young boy from Pakistan imitating Jasprit Bumrah ActionSakal
Updated on

Young boy from Pakistan imitating Jasprit Bumrah Action: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्याच्या सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणला जातो. त्याचं कौतुक अनेक दिग्गजांनीही केलं आहे.

बुमराहने त्याच्या गोलंदाजीने भारताला अनेक सामनेही जिंकून दिले आहेत. नुकताच तो टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेतील मालिकावीर पुरस्काराचाही मानकरी ठरला होता.

त्याची वेगवान गोलंदाजी खेळताना मोठमोठ्या फलंदाजांना कठीण जातं. अनेकदा त्याचे अचूक यॉर्कर थेट स्टंपचा वेध घेतात. महत्त्वाचं म्हणजे गोलंदाजी करताना त्याची अनोखी शैलीच त्याची मोठी ताकद आहे.

त्याच्या अशा कामगिरीमुळे त्याने अनेक लहान मुलांना प्रेरणा मिळाली आहे. अनेक जण त्याच्या गोलंदाजी शैलीची नक्कल करताना दिसतात विशेष म्हणजे केवळ भारतातीलच नाही, तर पाकिस्तानमध्येही त्याची लोकप्रियता दिसून आली आहे.

Young boy from Pakistan imitating Jasprit Bumrah Action
Jasprit Bumrah: बूम बूम बुमराहची कमाल! टी20 वर्ल्ड कप विजयानंतर ICC कडून मिळाला मोठा पुरस्कार; स्मृती मानधनाचाही सन्मान

सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानमध्ये एक लहान मुलगा बुमराहसारखी गोलंदाजी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ पाकिस्तानचे दिग्गज गोलंदाज वासीम आक्रम यांनीही शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले, 'वाह जी वाह! त्याचे नियंत्रण आणि शैली अगदी जसप्रीत बुमराहसारखी आहे. दिवसभरातील माझ्यासाठी हा सर्वोत्तम व्हिडिओ आहे.

या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा जोरात पळत येत बुमराहच्या शैलीप्रमाणे जोरात चेंडू टाकताना दिसत आहे. त्याचा हा चेंडू फलंदाजी करणाऱ्या मुलाला खेळताच आलेला नाही.

Young boy from Pakistan imitating Jasprit Bumrah Action
Cricket Viral Video: दोन ओव्हर अन् तब्बल 61 धावा...! क्रिकेटच्या सामन्यात घडला अविश्वसनीय पराक्रम

बुमराह टी20 वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम गोलंदाज

बुमराहने टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये 8 सामन्यांत 4.17 च्या इकोनॉमी रेटने 15 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला टी20 वर्ल्ड कप 2024 मधील सर्वोत्तम गोलंदाज ठरला होता.

बुमराहने आत्तापर्यंत 36 कसोटी सामने खेळले असून 159 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 89 वनडेत 149 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 70 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 89 विकेट्स घेतल्या आहेत.

Chitra smaran:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.