Duleep Trophy 2024: भारतातील क्रिकेटचा नवा हंगाम सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पहिलीच स्पर्धा दुलीप ट्रॉफी खेळवली जाणार आहे. ५ सप्टेंबरपासून स्पर्धेत अनेक मोठे स्टार खेळण्याची शक्यता आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही खेळणे बंधनकारक करण्यात आलेले नाही, परंतु खेळण्याचा निर्णय त्यांच्यावर सोपवण्यात आलाय.
दरम्यान विराट आणि रोहित या स्पर्धेतील किमान एक तरी सामना खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे. कारण त्यानंतर बांगलादेशविरुद्ध १९ सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळली जाणार आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून जवळपास सर्वच खेळाडू वनडे आणि टी२० क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे कसोटी सामन्यांसाठी दुलीप ट्रॉफी उपयुक्त ठरू शकेल. त्यामुळेच विराट आणि रोहित हे दोघेही या स्पर्धेत खेळण्याची दाट शक्यता आहे.