IND vs BAN, 1st test: गौतम सरांनी विराटकडून करून घेतला 45 मिनिटे सराव, जसप्रीत बुमराहने तर...

India vs Bangladesh 1st Test net session: भारतीय खेळाडू चेन्नईमध्ये पोहोचले असून सरावालाही सुरुवात झाली आहे.
Jasprit Bumrah - Virat Kohli
Jasprit Bumrah - Virat KohliSakal
Updated on

India vs Bangladesh 1st Test: भारत आणि बांगलादेश संघात १९ सप्टेंबरपासून २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघात निवड झालेले अनेक खेळाडू चेन्नईला पोहचले आहेत. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीसह जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, केएल राहुल अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे.

खेळाडूंसह मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर, गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल हे देखील चेन्नईत पोहचले आहेत. गंभीर आणि त्याच्या कोचिंग स्टाफची ही पहिलीच कसोटी मालिका आहे.

Jasprit Bumrah - Virat Kohli
IND vs BAN Test : टीम इंडियाला टक्कर देण्यासाठी बांगलादेशने जाहीर केला संघ; पाकिस्तानला लोळवले अन् आता...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.