Virat Kohli Hundred: विराटने ८१ व्या शतकासह रचले विक्रमांचे इमले अन् नंतर बुमराह-सिराजकडून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजी सुरूंग

Virat Kohli Century Records in IND vs AUS Perth Test: पर्थ कसोटीमध्ये विराट कोहलीने ८१ वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकताना अनेक विक्रम केले. त्याचे ऑस्ट्रेलियामधील हे १० वे शतकही आहे. यासह विराटने अनेक विक्रम केले, त्याचा घेतलेला आढावा.
Virat Kohli
Virat KohliSakal
Updated on

Australia vs India 1st Test: विराट कोहलीने ऑस्ट्रेलियात पोहचताच त्याच्या बॅटची ताकद सर्वांना दाखवली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवशी भारताकडून दुसऱ्या डावात विराट कोहलीने शतक झळकावत मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.

या सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल १६१ धावांवर आणि केएल राहुल ७७ धावांवर बाद झाल्यानंतरही विराटने भारताचा डाव गडगडू दिला नाही. त्याची शानदार फलंदाजी पाहायला मिळाली. त्याने १४३ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह त्याचे शतक पूर्ण केले.

त्याचे शतक पूर्ण होताच भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने दुसरा डाव घोषित केला. भारताने दुसऱ्या डावात ६ बाद ४८७ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर पहिल्या डावातील ४६ धावांच्या आघाडीसह ५३४ धावांचे लक्ष्य ठेवले.

Virat Kohli
IND vs AUS 1st Test : अपर कट अन् शतक! Yashasvi Jaiswal ची ऑस्ट्रेलियात सेंच्युरी; ४७ वर्षांपूर्वीच्या गावस्करांच्या विक्रमाशी बरोबरी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.