विराट कोहली - ऋषभ पंतचा मैदानात दिसला याराना, गॉगल केले अदला-बदली; Video Viral

IND vs BAN : भारताविरुद्ध बांगलादेश पहिला कसोटी सामना भारताने २८० धावांनी जिंकून मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
IND vs BAN
IND vs BANESakal
Updated on

Virat kohli-Rishabh Pant : बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना भारताने चौथ्या दिवशीच जिंकला. या सामन्यादरम्यान मैदानात भारतीय खेळाडू बऱ्याचदा मस्ती करतानाही दिसले. असा एक ऋषभ पंत आणि विराट कोहली यांचा व्हिडिओ समोर आला आहे.

सामन्यातील तिसऱ्या दिवशी मैदानावर रिषभ पंत आणि विराट कोहलीने एकमेकांच्या सनग्लासेसची अदलाबदल केल्याचे दिसून आले. त्यांच्या या कृतीतून एकमेकांबद्दल काळजी दिसून आली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भारताविरुद्ध बांगलादेश पहिल्या कसोटी सामन्यात भारताने २८० धावांनी बाजी मारली. या सामन्यात ऋषभ पंतने शतक ठोकले. परंतु विराट कोहलीला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.

सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारताने २८७ धावांनी डाव घोषित केला. भारतीय संघ दुपारच्या सत्रात मैदानवर फिल्डिंगसाठी आला. ऋषभ याष्टिमागे तर विराट स्लीपमध्ये फिल्डिंगसाठी उभा होता. दरम्यान त्यांनी आपल्या सनग्लासेसची अदलाबदल केल्याचे दिसून आले. विराट-ऋषभच्या या व्हिडीओसोबतच विराटने बांगलादेशच्या दुसऱ्या डावादरम्यान केलेला डान्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचे झाले असे की, सामन्यातील तिसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाच्या चेंडूवर ऋषभ पंतने शाकिब अल हसनचा अप्रतिम झेल घेतला.

विकेटची खात्री करण्यासाठी अंपायरने रिव्ह्यू घेतला. मोठ्या पडद्यावर हा निर्णय भारताच्या बाजूने आला आणि संपूर्ण संघाने आनंद साजरा केला. हे पाहून भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीनेही आनंद व्यक्त करत धमाल डान्स केला. त्याचा या डान्सचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ऋषभ पंत - शुभमन गिलची भागीदारी

सामन्यातील दुसऱ्या डावात ऋषभ पंतने शतक झळकावले, तर शुभमन गिलनेही ११९ धावांची नाबाद खेळी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १६७ धावांची खेळी भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात २८७ धावा उभारल्या.

सामनावीर अश्विन अण्णा

आर अश्विनने पहिल्या डावात संघाला सावरणारी १३३ चेंडूत ११३ धावांची शतकीय खेळी केली. आश्विन-जडेजाच्या जोडीने या डावात १९९ धावांची मोठी भागीदारी केली. आश्विनने या सामन्यात एकूण ६ विकेट्स घेतले व कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या ५२२ विकेट्स पूर्ण केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.