India vs Bangladesh Duleep Trophy : भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेतून पराभूत होऊन मायदेशी परतला आणि सध्या खेळाडू विश्रांतीवर आहेत. आता भारतीय खेळाडू थेट १९ सप्टेंबरला मैदानावर दिसती... १९ सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे. WTC Standings मध्ये भारत ६८.५१ टक्क्यांसह अव्वल स्थानावर आहे आणि त्यांना ऑस्ट्रेलिया ( ६२.५०) टक्कर देत आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपूर्वी कर्णधार रोहित शर्मा व स्टार फलंदाज विराट कोहली हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर येत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं ऑफ सिझन असताना राष्ट्रीय संघातील खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य द्यावे अशी BCCI चा आग्रह होता. यातून रोहित, विराट व जसप्रीत बुमराह या सीनियर्सना सूट दिली गेली होती. पण, रोहित व विराट हे आगामी दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपूर्वी खेळाडूंनी दुलीप ट्रॉफीत खेळावे, असा निवड समितीचा आग्रह आहे. ५ सप्टेंबरपासून ही स्पर्धा सुरू होत आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार शुभमन गिल, लोकेश राहुल, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव यांनाही दुलीप ट्रॉफीत खेळण्यासाठी विचारले गेले आहे. पण, जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याला विश्रांती दिली गेली आहे आणि तो दुलीप ट्रॉफीत खेळणार नाही.
भारतीय संघाला बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसह पुढील ४ महिन्यांत १० कसोटी सामने खेळायचे आहे. याचा विचार करून हा निर्णय घेतला गेला आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत फिरकीपटूंना पोषक खेळपट्टी असणार आहेत आणि मोहम्मद शमीचे पुनरागमन शक्य आहे, त्यामुळे जसप्रीतला याही मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते.
दुलीप ट्रॉफी चार विभागीय संघामध्ये खेळवली जाते. याची विभागणी भारत अ, भारत ब, भारत क आणि भारत ड अशा संघांत केली जाते. दुलीप ट्रॉफीचे सामने आंध्रप्रदेश येथील अनंतपूर येथे होतील. हे मैदान विमानतळाशी कनेक्टेड नसल्याने BCCI या स्पर्धेचा एक राऊंड बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्याचा विचार करत आहेत. ५ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या कालावधीत सहा सामने खेळवले जाणार आहेत. India vs Bangladesh यांच्यातली पहिली वन डे १९ सप्टेंबरपासून चेन्नईत खेळवण्यात येणार आहे.
सूर्यकुमार यादव, सर्फराज खान हे बूची बाबू स्पर्धेत खेळणार आहेत. १५ ऑगस्टपासून ही स्पर्धा होणार आहे. इशान किशनचाही दुलीप ट्रॉफीसाठी निवड समिती विचार करत आहे. किशनने रेड बॉल क्रिकेटमध्ये खेळावे, अशी निवड समितीची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी टीम इंडियात परतीसाठी हाच मार्ग आहे. इशान व श्रेयस अय्यर यांना बीसीसीआयने वार्षिक करारातून वगळले होते.
बांगलादेशचा भारत दौरा ( Bangladesh's Tour Of India 2024)
भारत वि. बांगलादेश, पहिली कसोटी: १९-२३ सप्टेंबर, चेन्नई
भारत वि. बांगलादेश, दुसरी कसोटी: २७ सप्टेंबर ते ऑक्टोबर, कानपूर
ट्वेंटी-२० मालिका
भारत वि. बांगलादेश, पहिली ट्वेंटी-२०: ६ ऑक्टोबर, धर्मशालला
भारत वि. बांगलादेश, दुसरी ट्वेंटी-२०: ९ ऑक्टोबर, दिल्ली
भारत वि. बांगलादेश, तिसरी ट्वेंटी-२०: १२ ऑक्टोबर, हैदराबाद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.