Virat kohli Birthday Wishes : भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीचा आज ३६ वा वाढदिवस आहे. विराटच्या वाढदिवशी सोशल मीडियावरून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक क्रिकेटपटूंनी विराटसोबतच्या आठवणी सोशल मीडियावर पोस्ट करत विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
माजी खेळाडू युवराज सिंगने विराट सोबतच्या आठवणींचा व्हिडीओ पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या सोशल मीडियावर पोस्ट करत युवराज म्हणाला, " विराट तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. संपुर्ण जग तुझ्या क्रिकेटमधील पुनरागमानाची वाट पाहात आहे. तु याआधी खुप काही मिळवलं आहेस आणि मला खात्री आहे की या पुढेही मिळवशील. शुभेच्छा आणि खुप सारे प्रेम!"
भारतीय नियामक मंडळाने देखील आपल्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून फोटो पोस्ट करत विराटला शुभेच्छा दिल्या. या पोस्टमध्ये बीसीआयने विराटच्या आत्तापर्यंत मिळालेल्या यशाची आकडेवारी मांडली आहे.
"५३८- आंतरराष्ट्रीय सामने
२७१३४- एकूण धावा
२०११ - आयसीसी वन-डे वर्ल्ड कप विजेता
२०१३ - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता
२०२४ - आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेता
माजी कर्णधार आणि सर्वोत्तम फलंदाज विराट तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा"
माजी फिरकीपटू हरभजनसिंगनेही विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हरभजन म्हणाला," वाढदिवसाच्या शुभेच्छा विराट कोहली! आश्वासक युवा प्रतिभेपासून ते आमच्या काळातील महान खेळाडूंपैकी एक असा तुझा प्रवास अभूतपूर्व होता. तु सर्वच महत्त्वाकांक्षी क्रिकेटपटूंना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी, कठोर परिश्रम करण्यासाठी आणि स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी प्रेरित केले आहेस. तुला उज्ज्वल आणि आनंदी जिवनासाठी शुभेच्छा."
भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि माजी खेळाडू रवी शास्री यांनीही विराटला शुभेच्छा दिल्या. शास्त्री म्हणाले, " वाढदिवसाच्या शुभेच्छा चॅम्पियन. लवकरच तुझा चांगला काळ सुरू होईल."
समालोचक आकाश चोप्राने आपल्या समालोचनाच्या अंदाजात विराटला अनोख्या शुभेच्छा दिल्या. "त्याच दिवशी वाटलेले की, हा मुलगा पुढे जावून काहीतरी वेगळं करून दाखवेल. वाढदिवसाच्या शुभेच्छा एकमेव द्वितीय विराट कोहली."
"एका प्रतिष्ठित क्रिकेटपटू आणि प्रेरणादायी व्यक्तीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा! येणारे वर्ष तुझ्यासाठी आनंदाचे आणि यशाने भरलेले जावो." सुरेश रैना म्हणाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.