IND vs BAN: विराटची तयारी जोरदार सुरू! शॉट खेळताना डायरेक्ट चेपॉकच्या मैदानाच्या भिंतीला भोकच पडलं

Virat Kohli Video: बांगलादेशविरुद्ध भारतीय संघ १९ सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ जोरदार सराव करत असून विराटने यावेळी एक जोरदार शॉट खेळला, ज्यामुळे स्टेडियमच्या भिंतीचं नुकसान झालं.
Virat Kohli
Virat KohliSakal
Updated on

India vs Bangladesh Test Series: भारतीय संघाला १९ सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील एम चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.

या सामन्यासाठी सध्या भारतीय संघ चेन्नईमध्ये आहे. अनेक भारतीय खेळाडू गुरुवारीत रात्री चेन्नईला पोहचले आहेत. दरम्यान चेन्नईला पोहचल्यानंतर लगेचच भारतीय खेळाडूंचा सरावही सुरु झाला आहे.

दरम्यान, या सरावादरम्यानचा एक व्हिडिओ जिओ सिनेमाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय खेळाडूंनी नेट्समध्ये केलेला सरावाची झलक दिसत आहे. याच व्हिडिओमध्ये असेही दिसते की भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीही नेट्समध्ये शॉट्स खेळण्याचा सराव करत आहे.

Virat Kohli
Ishan Kishan चे पुनरागमन, शुभमन गिलला आराम? IND vs BAN मालिकेसाठी टीम इंडियात वाहणार बदलाचे वारे
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.