Virat Kohli: 'विराट IPL ऑक्शनमध्ये ३० कोटींपेक्षा जास्त रक्कम सहज घेईल'; असं कोण म्हणालं? वाचा

IPL Auction: आयपीएल २०२५ हंगामापूर्वी मेगा ऑक्शन होणार असून त्यासाठी तयारी सुरू झाली आहे.
Virat Kohli | IPL
Virat Kohli | IPLSakal
Updated on

Virat Kohli in IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग २०२५ हंगामाआधी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे आता सर्वच संघात मोठे बदल दिलण्याची शक्यता आहे. या ऑक्शनसाठी बीसीसीआय आणि फ्रँचायझींची तयारीही सुरू झाली आहे. अशातच प्रसिद्ध लिलावकर्ता ह्यु एडमीड्स यांनी विराट कोहलीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

एडमीड्स यांच्या मते जर विराट ऑक्शनमध्ये आला, तर त्याला ३० कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळेल. विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून म्हणजे २००८ पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळत आहे.

त्यांनी त्याला आत्तापर्यंत झालेल्या सर्व हंगामांसाठी कायम केले आहे. त्याने या संघाचे बरेच वर्षे नेतृत्वही केले आहे. त्याच्या नेतृत्वात २०१६ साली बंगळुरूने उपविजेतेपदही मिळवले होते आता आगामी हंगामासाठीही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू त्याला कायम करण्याची शक्यता आहे.

Virat Kohli | IPL
Faf du Plessis उचलबांगडी? RCB च्या ताफ्यात IPL 2025 पूर्वी मेजर बदल; ६ रिटेन खेळाडू जवळपास पक्के
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.