विराट भाई BGT मे आग लगानी है... ऐकताच कोहलीची काय होती रिअ‍ॅक्शन, Video एकदा पाहा

Virat Kohli Viral Video: विराट कोहलीचा सध्या विमानतळावरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तो एका व्यक्तीला बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर (BGT) केलेल्या कमेंटवर भन्नाट रिऍक्शन देताना दिसला आहे.
Virat Kohli Viral Video
Virat Kohli Viral VideoSakal
Updated on

Virat Kohli Video: विराट कोहली लोकप्रिय खेळाडूंपैकी एक असल्याने त्याच्याभोवती नेहमीच चाहत्यांचा गराडा असतो. विमानतळावरही प्रवासादरम्यान त्याची झलक टिपण्यासाठी पॅपराजी उत्सुक असल्याचे दिसतात.

दरम्यान, असाच विराटचा एक विमानतळावरील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये तो एका व्यक्तीला बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर (BGT)केलेल्या कमेंटवर भन्नाट रिऍक्शन देताना दिसला आहे.

जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात दिसते की विराट कुठेतरी जाण्याच्या तयारीत आहे. याचवेळी त्याला पॅपराजींनी फोटोसाठी थांबवले. त्यावेळी तो काही क्षण त्यासाठी थांबला देखील.

त्यानंतर तो कारमध्ये बसण्यासाठी जात असतानाच त्याला तिथे कोणीतरी म्हणालं की विराट भाई BGT मध्ये आग लावायची आहे. हे ऐकून विराट थोडा चकीत झाला आणि त्याने विचारलं कोणाबरोबर? त्यावर त्या व्यक्तीने उत्तर दिलं की BGT मध्ये. त्यावर विराटने ठीक आहे असे भाव चेहऱ्यावर आणत कारमध्ये बसला.

Virat Kohli Viral Video
Team India Schedule: कसोटी मालिका संपली आता पुढची मॅच कधी... जाणून घ्या टीम इंडियाचं पुढील वेळापत्रक

विराट नुकताच बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत खेळला आहे. या मालिकेदरम्यान त्याला मोठी खेळी करता आली नाही. पण तरी त्याच्यासाठी ही मालिका विक्रमी ठरली.

त्याने या मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७ हजार धावा पूर्ण केल्या. त्याने ५९४ डावात २७ हजार धावा पूर्ण केल्याने तो सर्वात कमी डाव खेळताना २७ हजार धावा करणारा फलंदाज ठरला. यापूर्वी सचिन तेंडुलकरने ६२३ डावात २७ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी

बॉर्डर - गावसकर ट्रॉफी ही भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणारी कसोटी मालिका आहे. ही मालिका यंदा ऑस्ट्रेलियामध्ये नोव्हेंबरमध्ये सुरू होईल. त्यासाठी नोव्हेंबरमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.

Virat Kohli Viral Video
IND vs AUS : Rohit Sharma ची माघार, मग कोण असेल टीम इंडियाचा कर्णधार? ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी मोठा पेच

यंदा या मालिकेत पाच सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थला सुरू होईल. त्यानंतर ६ डिसेंबरपासून ऍडलेडला होणारा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे.

१४ डिसेंबरपासून ब्रिस्बेनला तिसरा सामना होईल, तर चौथा सामना मेलबर्नला २६ डिसेंबरपासून सुरू होईल. अखेरचा सामना नवीन वर्षी ३ जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळला जाईल. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेचाही भाग आहे. तसेच भारताची ही या स्पर्धेतील अखेरची मालिका आहे. त्यामुळे या मालिकेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, आर अश्विन, ऋषभ पंत अशा काही अनुभवी खेळाडूंच्या कामगिरीवर अनेकांचे लक्ष असणार आहे.

दरम्यान ऑस्ट्रेलियाने २०१५ नंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे ते आता पुन्हा ही ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रयत्नशील असतील, तर भारतीय संघ सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्यास उत्सुक असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.