IND vs BAN: दिल्ली के छोरे! गंभीर, विराट अन् पंतची एअरपोर्टवर बग्गी राईड, Video Viral

Virat Kohli, Gautam Gambhir, Rishabh Pant's Buggy Ride: भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी कानपूरला पोहचला आहे. या प्रवासादरम्यानचा विराट कोहली, गौतम गंभीर आणि ऋषभ पंत यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Virat Kohli, Gautam Gambhir, Rishabh Pant Buggy Ride
Virat Kohli, Gautam Gambhir, Rishabh Pant Buggy Ride Sakal
Updated on

India vs Bangladesh, 2nd Test: भारतीय क्रिकेट संघाला बांगलादेशविरुद्ध दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीम पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघ कानपूरला मंगळवारी (२४ सप्टेंबर) पोहचला.

यादरम्यानचे काही व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये भारताचे खेळाडू विराट कोहली व ऋषभ पंत आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर एकत्र दिसत आहेत.

बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना चेन्नईमध्ये २८० धावांनी जिंकल्यानंतर विराट, पंत आणि गंभीर कानपूरला रवाना झाले. यावेळी विमानतळावरील बग्गीची सुविधा वापरताना ते दिसले. जो व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Virat Kohli, Gautam Gambhir, Rishabh Pant Buggy Ride
Virat Kohli Ranji Trophy : विराट कोहलीची रणजी संघासाठी संभाव्य खेळाडूंमध्ये निवड, २०१९ नंतर प्रथमच देशांतर्गत क्रिकेट खेळणार?

व्हायरल व्हिडिओमध्ये हे तिघेही एकत्र बग्गीमधून प्रवास करताना दिसत आहेत. दरम्यान, हा व्हिडिओ कोणत्या विमानतळावरील आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र या व्हायरल व्हिडिओवर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत.

अनेकांनी याकडेही लक्ष वेधले की हे तिघेही दिल्लीकडून क्रिकेट खेळले आहेत. तर अनेकांनी अखेर विराट आणि गंभीर यांच्यातील बाँड चांगला झाला असल्याने आनंद व्यक्त केला आहे.

खरंतर विराट आणि गंभीर यांचं नातं नेहमीच क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय ठरला आहे. विराट आणि गंभीर आधी दिल्लीकडून एकत्र खेळले आहे, तसेच ते भारतीय संघाकडूनही एकत्र खेळले आहेत. मात्र त्यांची काहीवेळी मैदानात वादही झाले आहेत.

Virat Kohli, Gautam Gambhir, Rishabh Pant Buggy Ride
Virat Kohli Viral Video: 'सर मला दोनच हात आहेत...', हॉटेलमध्ये आल्यानंतर विराटला असं का म्हणावं लागलं?

आयपीएलमधील तर त्यांचे वाद अनेकदा चर्चेत आलेत. २०२३ आयपीएलदरम्यानही दोघांचं कडाक्याचं भांडण झालं होतं. पण त्यानंतर त्यांच्या नात्यातील कटूता दूर झाल्याचंही अनेकदा दिसून आलं.

२०२४ आयपीएलवेळीही हे दोघे एकमेकांशी चांगलं बोलताना दिसले होते. त्यातच आता गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. त्यानंतर आता या दोघांनीही कटूता विसरत एकमेकांबरोबर एक चांगला बाँड तयार केलेला दिसून येत आहे.

दरम्यान आता भारताला कानपूरला होणारा कसोटी सामना जिंकून मालिका २-० ने जिंकण्याची संधी आहे. तसेच जर बांगलादेशला मालिका पराभव वाचवायचा असेल तर त्यांना कानपूरला होणारा कसोटी सामना जिंकावाच लागणार आहे. जर हा सामना अनिर्णित राहिला, तरी ही मालिका भारतीय संघ जिंकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.