Team India Squad For T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 च्या आता जवळपास 30 पेक्षा जास्त सामने झाले आहेत. प्रत्येक संघाने किमान 6 सामने खेळले असून निवडसमिती त्या आधारे आगामी टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाच निवडीची आखणी करत आहे. दरम्यान, पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवडसमिती ही टीम इंडियाच्या नेहमीच्या खेळाडूंसोबतच जाण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे विराट कोहली टी 20 मध्ये फिट बसतो का? पांड्याचा फॉर्म पाहता त्याला रोहित आपल्या संघात घेणार नाही अशी चर्चा सुरू होती त्या चर्चेला पूर्ण विराम मिळण्याची शक्यता आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार भारताचा संभाव्य संघ हा 1 मे रोजी घोषित होण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव उघड न करण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, 'निवडसमिती टी 20 वर्ल्डकपसाठी कोणताही प्रयोग करणार नाहीये. जे खेळाडू भारतीय संघासाठी सातत्याने टी 20 खेळत आहेत ते सर्व खेळाडू संघात असतील. ज्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी 20 स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. आणि आयपीएलमध्ये देखील चांगली कामगिरी करत आहेत. त्यांना नक्कीच स्थान मिळेल.'
हार्दिकचा आयपीएलमधील फॉर्म खराब आहे. मात्र तो टी 20 वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघात स्थान मिळवले. तसेच विराट कोहलीचं देखील संघातील स्थान पक्क आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, ऋषभ पंत, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांची निवड ठरलेली आहे.
याचबरोबर शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल या दोघांपैकी एका खेळाडूची निवड होण्याची शक्यता आहे. जर या दोन्ही सलामीवीरांची निवड झाली तर शिवम दुबे आणि रिंकू सिंह यांच्यातील एकाचीच निवड केली जाऊ शकते.
दुसरीकडे बॅकअप विकेटकिपर निवडीवेळी निवडसमितीला मोठी कसरत करावी लागणार आहे. संजू सॅमसनने सर्वांचे टेन्शन वाढवले आहे. इशान किशन आणि केएल राहुलसोबत त्याची मोठी स्पर्धा असेल. हार्दिक पांड्याचा गोलंदाज म्हणून फिटनेस वादाच्या भोवऱ्यात असला तरी त्याच्या संघातील स्थानाला सध्या तरी कोणता धोका दिसत नाहीये. विराट कोहलीची संघ निवड देखील एक औपचारिकता असणार आहे.
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, ऋषभ पंत, केएल राहुल, संजू संजू आणि संजू समुह. , मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, आवेश खान.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.