Virat Kohli Viral Video: 'सर मला दोनच हात आहेत...', हॉटेलमध्ये आल्यानंतर विराटला असं का म्हणावं लागलं?

Virat Kohli Video: भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी कानपूरला पोहचला आहे. यावेळी हॉटेलमध्ये खेळाडूंचे स्वागत होत असताना विराटला सांगावं लागलं की त्याला दोनच हात आहेत. त्यावेळी नक्की काय झालं पाहा.
Virat Kohli Viral Video
Virat Kohli Viral VideoSakal
Updated on

India vs Bangladesh Kanpur Test: भारत विरुद्ध बांगलादेश संघात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील चेन्नईला झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने २८० धावांनी दणदणीत विजय मिळवला होता.

या विजयानंतर भारतीय संघाला बांगलादेशविरुद्ध कानपूरमधील ग्रीन पार्क येथे होणार आहे. हा सामना २७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या सामन्यासाठी मंगळवारी (२४ सप्टेंबर) भारतीय संघ कानपूरला पोहचले आहेत.

भारतीय संघातील खेळाडू कानपूरला पोहचल्यानंतरचे काही व्हिडिओही समोर आले आहेत. अशाच एक व्हिडिओ विराट कोहलीचाही व्हायरल होत आहे, ज्यात त्याला हॉटेलमधील स्टाफला आठवण करून द्यावी लागली की त्याच्याकडे दोनच हात आहेत.

Virat Kohli Viral Video
IND vs BAN: Virat Kohli ची विकेट वादग्रस्त ठरली, पण पठ्ठ्याने १७ धावा करूनही मोठा पराक्रम केला

झाले असे की विराटचे भारतीय संघ थांबणार असलेल्या हॉटेलमध्ये स्वागत केले जात होते. त्याच्यासह भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतही होता. त्यावेळी अंदाजे हॉटेलमधील अधिकारी असलेल्या व्यक्ती खेळाडूंचे स्वागत करत होते.

त्यातील एका व्यक्तीने त्याला फुलांचा गुच्छ दिला. विराटनेही हसून तो स्विकारला आणि आभारही मानले. पण त्याचवेळी तेथील एका व्यक्तीला त्याच्याशी हस्तांदोलन करायचे होते.

पण त्यावेळी विराटच्या एका हातात बॅग आणि दुसऱ्या हातात फुलांचा गुच्छ होता. त्यावेळी विराट त्यांना म्हणाला, 'सर दोनच हात आहेत.' त्यानंतर विराट तिथून पुढे निघाला. त्यानंतर ऋषभ पंतचेही स्वागत करण्यात आले.

Virat Kohli Viral Video
Virat Kohli Ranji Trophy : विराट कोहलीची रणजी संघासाठी संभाव्य खेळाडूंमध्ये निवड, २०१९ नंतर प्रथमच देशांतर्गत क्रिकेट खेळणार?

दरम्यान, भारत आणि बांगलादेश संघात होत असलेली मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचाही भाग आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची आहे.

भारताने पहिला सामना जिंकला असल्याने आता दुसरा सामना जिंकून भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान आणखी भक्कम करण्याची संधी असणार आहे, तर बांगलादेशला पुन्हा पहिल्या चारमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.

तसेच दुसरा कसोटी सामना जर भारताने जिंकला, तर ते मालिकाही २-० ने जिंकतील. त्याबरोबर हा सामना अनिर्णित राहिला, तरी भारतीय संघ ही मालिका १-० फरकाने जिंकेल. त्यामुळे बांगलादेशला पराभव टाळून बरोबरीच मालिका सोडवण्यासाठी दुसऱ्या कसोटीत विजय मिळवणे गरजेचेच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.