Virat Kohli Highest Tax Payer Cricketer: भारतात लोकप्रिय खेळ कोणता असं विचारलं, तर सहज उत्तर मिळतं क्रिकेट. त्यामुळे क्रिकेटपटूंनाही मोठ्याप्रमाणाच लोकप्रियता मिळते. याचमुळे त्यांच्या ब्रँड व्हॅल्युही मोठी असते.
आता कमाई मोठ्या प्रमाणात क्रिकेटपटू करत असल्याने त्यांना करही तितक्याच मोठ्या प्रमाणात भरावा लागतो. नुकतेच फॉर्च्युन इंडियाने २०२४ मध्ये सर्वाधिक कर भरणाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सर्वाधिक कर भरणाऱ्या टॉप ५ क्रिकेटपटूंचीही नावं समोर आली आहेत.
भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक कर स्टार फलंदाज विराट कोहली भरतो. त्याने २०२४ वर्षासाठी तब्बल ६६ कोटी रुपये कर भरला आहे.