आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी हॉल ऑफ फेममध्ये तीन दिग्गजांना सामील करत असल्याचे घोषित केले. यामध्ये इंग्लंडचा दिग्गज फलंदाज ऍलिस्टर कूर, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिविलियर्स आणि भारताची दिग्गज महिला खेळाडू नितू डेव्हिड यांचा समावेश करण्यात आला आहे.
ही घोषणा आयसीसीने केल्यानंतर काहीचवेळात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने डिविलियर्सला लिहिलेलं एक खुलं पत्र (Open Letter) समोर आलं आहे. यामध्ये विराटने डिविलियर्सच्या खेळाबद्दल आणि त्याच्यासोबत खेळण्याबद्दल लिहिलं आहे. त्यावर एबी डिविलियर्सने उत्तरही दिलं आहे.
विराट आणि डिविलियर्स एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत आहे. त्यांनी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाकडून अनेक वर्षे एकत्र क्रिकेट खेळले आहेत.