Virat Kohli, Rohit Sharma Replacement : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताच्या सीनियर्सनी ज्याप्रकारे माती खाली, ते पाहता बदल व्हायलाच हवा, असा सूर धरला जात आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांनी या मालिकेत अनुक्रमे ९१ व ९३ धावाच करता आल्या. मागील १० कसोटी डावांमधील या दोघांची कामगिरी अजूनही निराशाजनक आहे. त्यामुळे आगामी ऑस्ट्रेलिया दौरा या दोघांचा अखेरचा असू शकतो, असे वृत्त आहे. पण, रोहित व विराट यांच्या रिप्लेसमेंटसाठी खरंच टीम इंडिया तयार आहे का? त्यांच्याकडे तसे पर्याय आहेत का?