Virat Kohli : रोहितला सांगितलं मला काही विश्वास वाटत नाहीये.... पंतप्रधानांशी बोलताना विराटने केला मोठा खुलासा

Virat Kohli PM Narendra Modi : विराट कोहलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलताना फायनलवेळी त्याची मानसिकता कशी होती हे सांगितलं.
Virat Kohli Interaction With PM Narendra Modi
Virat Kohli PM Narendra Modi esakal
Updated on

Virat Kohli Interaction With PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 जुलैला सकाळी विश्वविजेत्या भारतीय संघाची भेट घेतली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघातील सर्व खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी विराट कोहलीने देखील 'मन की बात' केली. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता. त्याने 59 चेंडूत 76 धावांची दमदार खेळी केली.

Virat Kohli Interaction With PM Narendra Modi
Team India Prize: महाराष्ट्र शासनाकडून जगज्जेत्या टीम इंडियाला 11 कोटींचं बक्षीस, मुख्यमंत्री शिंदेची मोठी घोषणा

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराटशी संवाद साधला त्यावेळी विराट म्हणाला की, 'सर्वात प्रथम तुम्ही आम्हाला इथं आमंत्रित केलं यासाठी आभारी आहे. हा दिवस माझ्या ह्रदयात कायम राहील. मी या स्पर्धेत फार काही योगदान देऊ शकलो नव्हतो. मी राहुल भाईला म्हणालो होतो की मी संघासोबत आणि स्वतःसोबतही न्याय करत नाहीये. मात्र त्यांनी मला सांगितले की ज्यावेळी संधी येईल त्यावेळी तू कामगिरी करशील अशी आशा मला आहे.'

विराट कोहली पुढे म्हणाला की, 'ज्यावेळी मी फायनलमध्ये रोहित शर्मासोबत फलंदाजीला गेलो. मी रोहितला म्हणालो देखील की मला स्वतःवर विश्वास नाहीये. मात्र मला सलग तीन चौकार मिळाले अन् मी त्याला म्हणालो की, हे काय होत आहे. एक दिवस मला एक धावही करता येत नाहीये. आता मला एकाच षटकात तीन चौकार मिळाले आहेत.'

Virat Kohli Interaction With PM Narendra Modi
Devendra Fadnavis: "रोहित शर्माकडून राजकारण्यांनी शिकावं..."; देवेंद्र फडणवीसांनी काय सल्ला दिला?

विराट कोहलीने फायनलवेळी कशी फलंदाजी केली हे सांगितलं. तो म्हणाला की, 'ज्यावेळी आपल्या तीन विकेट्स गेल्या होत्या त्यावेळी मी संघासाठी जे काही गरजेचं ते करण्याचं ठरवलं. मला वाटलं की मला या परिस्थिती टाकण्यात आलं आहे. या भावना व्यक्त करणं सोपं नाही. काही गोष्टी घडायच्या असतात त्या आपल्या हातात नसतात.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.