India vs Australia Tour: न्यूझीलंडविरुद्धच्या अपयशानंतर विराट कोहली सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी ‘भुकेला’ आहे, तसेच ऑस्ट्रेलियात नेहमीच त्याच्याकडून उत्तम कामगिरी झालेली आहे. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल, असे मत माजी विक्रमवीर फलंदाज सुनील गावसकर यांनी व्यक्त केले.
केवळ न्यूझीलंडविरुद्धच नव्हे तर विराट कोहलीला गेल्या काही महिन्यांत तिन्ही प्रकारात फार चांगले यश मिळवता आलेले नाही. गेल्या ६० कसोटी डावांत त्याला केवळ दोन शतके आणि ११ अर्धशतकेच करता आलेली आहेत.
यंदाचे वर्ष संपत आलेले असताना त्याची यंदाची सरासरी २२.७२ (सहा कसोटींत मिळून) एवढी घसरली आहे. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात झालेल्या तीन कसोटीत मिळून विराटला केवळ ९३ धावाच करता आलेल्या आहेत.