India vs South Africa: सूर्यकुमारच्या टीम इंडियाबरोबर गंभीर नाही, तर 'हा' दिग्गज कोच म्हणून जाणार दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर

Team India Coach: भारतीय क्रिकेट संघाला पुढच्या महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिकेला जाणार नाही.
India vs South Africa T20I
Team IndiaX/BCCI
Updated on

Team India head coach: भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक आता बरेच व्यस्त आहे. सध्या भारतीय संघ न्यूझीलंड क्रिकेट संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. ही मालिका सुरू असतानाच भारताचा टी२० संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे.

भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ४ टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आता या दौऱ्यासाठी प्रभारी प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघासोबत जाणार असल्याचे समजत आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय कसोटी संघाला २२ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यामुळे या मालिकेच्या तयारीसाठी भारताचा नियमित मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर भारतीय कसोटी संघासोबत असणार आहे.

India vs South Africa T20I
Pakistan Cricket: गॅरी कर्स्टन चार महिन्यातच सोडणार पाकिस्तानचे प्रशिक्षकपद, नव्या कॅप्टनची नियुक्तीनंतर आले मोठे अपडेट्स
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.