Wanindu Hasaranga : निवृत्तीतून यू-टर्न घेणाऱ्या खेळाडूवर ICC ने घेतली मोठी ॲक्शन! 'या' चुकीमुळे सस्पेंड, आता IPL खेळणार?

Wanindu Hasaranga News : श्रीलंका क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी कसोटीतून निवृत्ती घेतली. मात्र त्याने निवृत्तीतून यू-टर्न घेतला आणि परत आला.
Wanindu Hasaranga News Marathi
Wanindu Hasaranga News Marathisakal
Updated on

Wanindu Hasaranga News : श्रीलंका क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी कसोटीतून निवृत्ती घेतली. मात्र त्याने निवृत्तीतून यू-टर्न घेतला आणि परत आला. त्यानंतर आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी बांगलादेशविरुद्ध 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेच्या संघात वानिंदू हसरंगाचा समावेश करण्यात आला आहे.

तेव्हा सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसला. कारण तो शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांमधून बाहेर असण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) त्याच्यावर मोठी कारवाई केली असून, त्यामुळे तो या मालिकेत खेळू शकणार नाही. त्यामुळे तो त्याच्या IPL फ्रँचायझीसाठी सुरुवातीच्या सामन्यांमध्ये उपलब्ध राहू शकतो.

Wanindu Hasaranga News Marathi
IPL 2024 : मुंबई इंडियन्सला आणखी एक धक्का! सूर्या फिटनेस टेस्टमध्ये नापास, इतक्या सामन्यातून बाहेर

बांगलादेशविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान वानिंदू हसरंगाने आयसीसी आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.8 चे उल्लंघन केले, जे एका आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान पंचाच्या निर्णयाशी असहमतीशी संबंधित आहे. सामन्याच्या 37 व्या षटकात हसरंगाने पंचाची टोपी हिसकावून अंपायरिंगची खिल्ली उडवल्याची घटना घडली होती. यामुळे 24 महिन्यांच्या कालावधीत त्याचे एकूण 8 डिमेरिट गुण झाले आहेत.

Wanindu Hasaranga News Marathi
IPL New Review System : आयपीएलमध्ये नवी रिव्ह्यू प्रणाली ; पंचांचे निर्णय आता अधिक अचूक अन्‌ वेळेत

श्रीलंकेचा एकदिवसीय संघाचा कर्णधार कुसल मेंडिसलाही तिसऱ्या सामन्याच्या शेवटी पंचांना शिवीगाळ केल्याप्रकरणी लेव्हल 2 च्या गुन्ह्यासाठी 50 टक्के दंड आणि तीन डिमेरिट गुणांचा सामना करावा लागला आहे.

कुसल मेंडिसने संहितेच्या अनुच्छेद 2.13 चे उल्लंघन केले आहे, जे आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान खेळाडू, पंच किंवा सामनाधिकारी यांच्या वैयक्तिक गैरवर्तनाशी संबंधित आहे. हसरंगा आणि मेंडिस या दोघांनीही त्यांचे गुन्हे कबूल केले आणि एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफरीच्या अँडी पायक्रॉफ्टने प्रस्तावित केलेल्या निर्बंधांना मान्यता दिली.

वानिंदू हसरंगाने 2020 साली श्रीलंकेकडून कसोटी फॉर्मेटमध्ये पदार्पण केले. त्याच वेळी तो 2021 मध्ये श्रीलंकेसाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. वानिंदू हसरंगाने श्रीलंकेसाठी आतापर्यंत चार कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने एकूण 196 धावा केल्या आहेत आणि चार विकेट्सही घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्येही त्याच्या नावावर अर्धशतक आहे. याशिवाय त्याने श्रीलंकेसाठी 54 एकदिवसीय आणि 65 टी-20 सामने खेळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.