IND vs NZ Test: दीडशतकानंतर वॉशिंग्टन सुंदरला मिळालं बक्षीस! पुणे - मुंबई कसोटीसाठी टीम इंडियात संधी

Washington Sundar added to India squad: भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर आता बीसीसीआयने पुढील दोन कसोटींसाठी वॉशिंग्टन सुंदरची भारतीय संघात निवड केली आहे.
Washington Sunder | India vs New Zealand 1st test
Washington Sunder | India vs New Zealand 1st testSakal
Updated on

India vs New Zealand, Test: भारतीय संघ सध्या न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना बंगळुरूमध्ये पार पडला. या सामन्यात रविवारी (२० ऑक्टोबर) भारताला पराभूत व्हावं लागलं.

आता भारताला न्यूझीलंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना पुण्यात, तर तिसरा कसोटी सामना मुंबईमध्ये खेळायचा आहे. या सामन्यांआधी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघात बदल केला आहे.

या दोन्ही सामन्यांसाठी अष्टपैलू क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदरला भारतीय संघात सामील करण्यात आले आहे. रविवारी झालेल्या पराभवानंतर बीसीसीआयने हा निर्णय जाहीर केला आहे.

Washington Sunder | India vs New Zealand 1st test
IND vs NZ, Test: न्यूझीलंडने बंगळुरूचं मैदान जिंकलं! तब्बल ३६ वर्षांनी भारताला मायदेशात हरवलं
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.