IND vs BAN: स्वत: च्याच बॉलिंगवर 'सुंदर' कॅच घेणारा वॅाशिंगटन ठरला बेस्ट फिल्डर, 'या' खेळाडूंना टाकलं मागं

IND vs BAN : बांगलादेशविरूद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिकाही भारताने ३-०ने जिंकली.
Washington Sundar
Washington Sundaresakal
Updated on

Best Fielder OF The Series: बांगलादेशविरूद्धचा ट्वेंटी-२० सामना भारताने १३३ धावांनी जिंकला. भारताने बांगलादेशला व्हाईटवॉश करत मालिका ३-० ने जिंकली. ज्यामध्ये मालिकावीर पुरस्कार तीन्ही सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याला मिळाला. तर बेस्ट फिल्डर मेडलचा मानकरी वॅाशिंगटन सुंदर ठरला. बीसीसीआयने 'बेस्ट फिल्डर मेडल' वितरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बांगलादेशविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत ३-० असा एकतर्फी विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने नेहमीप्रमाणे बेस्ट 'फिल्डर ऑफ द सिरीज' पदकाचे वितरण केले. पदकाच्या शर्यतीत हार्दिक पांड्या, रियान पराग, वॅाशिंगटन सुंदर हे उमेदवार होते. ज्यामध्ये पहिल्या सामन्यात स्वत:च्याच गोलंदाजीवर सुंदर झेल करून कर्णधार शांतोला बाद करणाऱ्या वॅाशिंगटन सुंदरला पदक देण्यात आले. हार्दिक पांड्या व रियान परागने देखील या मालिकेत अशक्य झेल पकडून दाखवले, परंतु त्यांना मागे टाकत यावेळी सुंदरने पदक पटकावले. युवा खेळाडू जितेश शर्माच्या हस्ते सुंदरला पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

वन-डे वर्ल्डकप २०२३ पासून भारतीय संघातील क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांनी ही प्रथा सुरू केली होती. तेव्हापासून सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला हे मेडल दिले जाते. यावेळी बांगलादेशविरूद्धच्या मालिकेत महत्वाचे ३ झेल पकडणारा वॅाशिंगटन सुंदर या पदकाचा मानकरी ठरला.

संपूर्ण मालिकेत भारतीय संघाने एकूण १८ झेल पकडले. टी दिलीप यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ क्षेत्ररक्षणामध्ये लक्षणीय कामगिरी करत आहे. भारताच्या प्रत्येक विजयात क्षेत्ररक्षकांचे महत्वाचे योगदान असते.

Washington Sundar
IND vs BAN: मी पाहिलेल्या सर्वोत्तम शतकांपैकी एक; कर्णधाराकडून संजूचे कौतुक, BCCIने केला व्हिडीओ शेअर

भारतविरूद्ध न्यूझीलंड

बांगलादेशविरूद्धची कसोटी आणि ट्वेंटी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरूद्धची कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. तीन सामन्यांची ही कसोटी मालिका असून १६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.