Wasim Akram:पाकिस्तानचा बांगलादेशकडून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सपशेल पराभव झाला. यानंतर पाकिस्तान संघावर जगभरातून टीका केली जात आहे. यात पाकिस्तानी माजी खेळाडूंकडूनही टीका होत आहे.
पाकिस्तानच्या २-० ने झालेल्या पराभवानंतर माजी कर्णधार वसीम अक्रम यांनीदेखील पाकिस्तान संघावर टीकास्त्र सोडले आहे. अक्रम म्हणाले की, "घरच्या मैदानावरचा पाकिस्तानचा हा पराभव एक माजी क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार म्हणून माझ्यासाठी ' लाजिरवाणा आहे."
"हा पराभव म्हणजे एक मोठा धक्का आहे. आमच्या देशातील क्रिकेटची परिस्थिती खूपच वाईट आहे. आम्ही घरच्या मैदानावर सातत्याने हरत आलो आहोत आणि हे आमच्या क्रिकेटच्या गुणवत्तेबद्दल बरेच काही सांगते."
दक्षिण आफ्रिकेने २०२१ मध्ये पाकिस्तानचा दौरा केल्यापासून पाकिस्तानने एकही मालिका मायदेशात जिंकलेली नाही.
अक्रम पुढे म्हणाले की, "पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुणवत्तेची कमतरता आहे. त्यामुळे दुखापती किंवा खेळाडूंच्या खराब फॉर्मसाठी संघाकडे योग्य बॅकअप पर्याय नसतो."
पाकिस्तानच्या माजी खेळाडूंसोबतच आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू(RCB) संघाने आणि समालोचक हर्षा भोगले यांनीदेखील पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली आहे.
या मालिकेपूर्वी बांगलादेशला १२ कसोटी मालिकांमध्ये पाकिस्तानला हरवता आले नव्हते. इतकेच नव्हे तर बांगलादेश सर्व फॉरमॅटमधील पाकिस्तानात खेळलेल्या २० मालिकांमध्येही जिंकला नव्हता. पण, ही कसोटी मालिका जिंकून बांगलादेशने इतिहास रचला.
पाकिस्तानविरुद्धच्या या दणदणीत विजयानंतर बांगलादेश संघ १९ सप्टेंबरपासून २ कसोटी आणि ३ ट्वेंटी-२० सामने खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.